अहमदाबाद : गुजरात टायटन्सच्या टीमने पदार्पणाचा सिझन चांगलाच गाजवलाय. पदार्पण केलेल्या सिझनमध्ये विजयी सलामी देत आयपीएल विजेतेपदावर नाव कोरलंय. दरम्यान कालच्या सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर राजस्थान फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरली. मात्र यावेळी राजस्थानच्या जॉस बटलरला साजेशी कामगिरी करता आली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या फायनलमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर बटलर स्वत:वर खूप संतापलेला दिसला आणि रागाच्या भरात तो नियंत्रण ठेवू शकला नाही. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 


अवघ्या 39 रन्सवर आऊट झाल्यानंतर जॉस बटलर पॅव्हेलियनमध्ये परतताना रागाने लालबुंद झाला होता. यावेळी त्याने हेल्मेट आणि ग्लोव्ह्ज फेकून दिले. त्याचं हे कृत्य कॅमेरामध्ये कैद झालंय. 


संतापलेल्या जॉस बटलरचा व्हिडीयो पाहण्यासाठी क्लिक करा


गुजरात टायटन्सविरुद्ध आरआरसाठी डावाची सुरुवात करणाऱ्या बटलरकडून मोठ्या खेळीची सुरुवात चांगली होईल, अशी अपेक्षा होती. त्याला सेट व्हायला बराच वेळ लागला. आणि त्यानंतर त्याला टीमसाठी मोठी खेळीही करता आली नाही. 


ही संपूर्ण घटना राजस्थानच्या 13व्या ओव्हरमध्ये घडली. हार्दिक पांड्याने ऑफ-स्टंपच्या बाहेर पहिला बॉल फेकला. बटलर या बॉलवर शॉट मारायला गेला आणि तिथेच फसला. ज्याचा फटका बटलरला महत्त्वाची विकेट गमावून चुकवावा लागला. आऊट झाल्यानंतर तो स्वत:च्या या चुकीवर चांगलाच संतापलेला दिसला आणि पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याने आपले हेल्मेट आणि ग्लोव्ह्ज दोन्ही फेकून दिलंय.