Jos Buttler Viral Video: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघामध्ये थरारक सामना रंगला होता. सामना तसा लवकर संपला असता, पण बटलरची (Jos Buttler) विकेट जरा लवकरच गेली. त्यामुळे राजस्थानला विजय थोडा लांबला गेला. तशी राजस्थानची टीम बजला घेण्याच्या हिशोबानेच मैदानात उतरली होती. आयपीएलच्या मागील हंगामातील फायनल सामन्यात गुजरातने राजस्थानचा पराभव केला होता, त्याचा बदला नक्की राजस्थानच्या रजवाड्यांनी घेतला आहे. गुजरातन टायटन्स संघाच्या 178 धावांचा पाठलाग करताना दमदार विजय नोंदवला. राजस्थान रॉयल्सने 3 विकेट्स राखून हा सामना जिंकला होता. मात्र, सामन्यापेक्षा चर्चा रंगलीये ती एका तरुणीची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बटलर (Jos Buttler) तसा स्टायलिश खेळाडू, पोरी फिदा होणं ही साहजिक गोष्ट. गेल्या चार वर्षात बटलरने क्रिकेटविश्वात चांगलं नाव कमावलं. एवढंच काय तर, इंग्लंडला वर्ल्ड कप देखील जिंकवून दिलाय. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा जगभर झाली. भारतात देखील त्याच्या नावाची मोठी क्रेझ आहे. अशातच एका तरुणीचा व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. 


हॅलो, कशा आहात? असा प्रश्न बटलरने विचारला. मी छान आहे, मी तुझी खूप मोठी फॅन आहे, असं ती बटलरला सांगते. मला तू खूप आवडतो, आय लव यू, असं म्हणताना पोरीचं मन हुरहुरल्याचं दिसून आलं. तुला आयपीएल बघायला आवडते का? असा सवाल बटलरने विचारला. त्यावर होय, मी आयपीएलचा आनंद घेतीये आणि आरआरला सपोर्ट करण्यासाठी आली आहे, असं ती म्हणते.


पाहा Video 



दरम्यान, तरूणीने बटलरची ओटोग्राफ घेतली आणि भेटल्याबद्दल बटलरचे मनापासून आभार मानले. गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्याआधी तो नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये सराव करत असताना ती चाहती बटलरला भेटायला आली होती. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केलाय. I love you so much, असं कॅप्शन राजस्थानने दिलंय.