ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकण्यामागे धोनीचा हात, कॅप्टन एरॉन फिंच म्हणाला....
टी 20 विश्व चषकाच्या अंतिम सामन्यात (T 20 World Cup 2021) न्यूझीलंडला पराभूत करत ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा टी 20 चॅम्पियन ठरला.
दुबई | टी 20 विश्व चषकाच्या अंतिम सामन्यात (T 20 World Cup 2021) न्यूझीलंडला पराभूत करत ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा टी 20 चॅम्पियन ठरला. ऑस्ट्रेलियाने कर्णधार एरॉन फिंचच्या (Aaron Finch) नेतृत्वात ही कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत कोणा एकावर अवलंबून न राहता सांघिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक खेळाडू हे प्रत्येक सामन्यात चमकला. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधार फिंचने सर्व खेळाडूंचं कौतुक केलं. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने (Josh Hazlewood) चमकदार कामगिरी केली. फिंचने यासाठी हेझलवूडचं कौतुक केलं. विशेष म्हणजे फिंचने हेझलवूडच्या या कामगिरीच क्रेडीट हे आयपीएल (IPL 2021) आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याला दिलंय. (Josh Hazlewood shared csk of ipl 2021 experience with Australian team which greatly benefited of team says Aaron Finch)
फिंच काय म्हणाला?
टी 20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना संपल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळेस फिंच बोलत होता. "आयपीएलमध्ये हेझलवूड चेन्नईकडून खेळत होता. त्याला चेन्नईकडून खेळताना खूप अनुभव मिळाला. त्याच्या या अनुभवाचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला. हेझलवूडने आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला केन रिचर्डसनच्या जागी अनेकदा संधी देण्यात आली", असं फिंचने स्पष्ट केलं.
हेझलवूड धोनी आणि सीएसकेसोबत खेळल्याचा अनुभव ऑस्ट्रेलियाला फायदेशीर
"जोश हेझलवूड हा आमचा प्रमुख गोलंदाज होता. हेझलवूड धोनी आणि सीएसकेसोबत खेळल्याचा अनुभव ऑस्ट्रेलियाला फायदेशीर ठरला. धोनीने हेझलवूड अचूक गोलंदाजी कशी करायची आणि केव्हा कसा बॉल टाकायचा, हे उत्तमरित्या सांगितलं. हेझलवूडने हा सर्व अनुभव आमच्याशी शेअर केला. हेझलवूडचा अनुभव आमच्यासाठी फायदेशीर ठरला", असं फिंचने स्पष्ट केलं. फिंचला पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर फिंचने हे उत्तर दिलं.