पंजाबच्या के.एल.राहुलचं सर्वात जलद अर्धशतक
किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना के.एल.राहुलनं आयपीएलमधलं सर्वात जलद अर्धशतक झळकावलं आहे.
मोहाली : किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना के.एल.राहुलनं आयपीएलमधलं सर्वात जलद अर्धशतक झळकावलं आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या मॅचमध्ये राहुलनं फक्त १४ बॉल्समध्येच अर्धशतक केलं. १६ बॉल्समध्ये ५१ रन्स करून राहुल आऊट झाला. राहुलच्या इनिंगमध्ये ६ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता.
सर्वात जलद अर्धशतक करणारे खेळाडू
खेळाडू | टीम | विरुद्ध | वर्ष |
के.एल.राहुल(१४बॉल) | पंजाब | दिल्ली | २०१८ |
युसुफ पठाण(१५बॉल) | कोलकाता | हैदराबाद | २०१४ |
सुनिल नारायण(१५बॉल) | कोलकाता | बैंगलोर | २०१७ |
सुरेश रैना(१६बॉल) | चेन्नई | पंजाब | २०१४ |
अॅडम गिलख्रिस्ट (१७बॉल) | हैदराबाद | दिल्ली | २००९ |