पैशासमोर देशप्रेम जिंकणार का? कगिसो रबाडा कशाची निवड करणार देश की IPL?
कचाट्यात सापडला रबाडा, देश की IPL? तुम्हाला काय वाटतं त्याने कशाची निवड करावी?
मुंबई : आयपीएल स्पर्धा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी येत आहे. दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेश दौरा असल्याने टीम जाहीर झाली. याच वेळी जवळपास 8 खेळाडूंची नाव ही आयपीएल आणि बांग्लदेश विरुद्धच्या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका टीममध्ये आहेत. त्यामुळे हे खेळाडू आयपीएलचे काही सामने त्यांना चुकणार आहेत.
या सगळ्यावर आता तोडगा कसा काढायचा हा प्रश्न बीसीसीआयसमोर आहे. यामध्ये कसिगो रबाडा देखील आहे. कगिसो रबाडाचं सिलेक्शन दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये देखील झालं आहे. याशिवाय त्याचं आयपीएलमध्ये खेळणंही गरजेचं आहे. मात्र आता तो कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
कगिसो रबाडाला दक्षिण आफ्रिका 3.84 कोटी रुपये सॅलरी देतं. तर लीगमधून त्याला साधारण 18.75 कोटी रुपयांची कमाई होते. पंजाब किंग्सने यंदा रबाडाला 9.25 कोटी रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं आहे. रबाडाला लीगमध्ये त्याच्या सॅलरीच्या दुप्पट फायदा मिळतो. मग असं असताना रबाडा आता नेमकं कोणाला निवडणार हे फायद्याचं आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाला कगिसोवर बोली लावयची होती. त्यांनी तसा प्रयत्नही केला. मात्र पंजाब संघाने हा डाव उधळून लावला. पंजाबने जास्त बोली लावून आपल्याकडे रबाडाला घेतलं. आता रबाडा देशाकडून खेळणार की आयपीएलची निवड करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.