Kamran Akmal retirement : ऑस्ट्रेलियाचा टी20 चा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने (Aaron Finch retirement) आज  7 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्याच्या या निवृत्तीची चर्चा असतानाच आणखीण एका स्टार खेळाडूने निवृ्त्तीची घोषणा केली आहे. या स्टार खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृ्त्तीची घोषणा केली आहे. त्याच्या या निवृ्त्तीची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान नेमका हा खेळाडू कोण आहे? व त्याचे क्रिकेटमधील योगदान काय आहे? हे जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अ‍ॅरॉन फिंचनंतर आता पाकिस्तानचा विकेटकिपर फलंदाज कामरान अकमलने (Kamran Akmal retire) क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. नुकतेच त्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निवड समितीमध्ये स्थान दिले होते. त्यामुळे आपल्या नवीन जबाबदारीकडे लक्ष देण्यासाठी त्याने निवृत्तीची घोषणा घेतल्याची चर्चा आहे. 


निवृत्तीवर काय म्हणाला? 


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गेल्या काही आठवड्यापुर्वीच कामरान अकमलला (Kamran Akmal)निवड समितीमध्ये स्थान दिले होते. प्रादेशिक आणि जिल्हा संघांच्या निवडीसाठी U13, U16 आणि U19 चाचण्या घेण्यासाठी PCB ने गठित केलेल्या निवड समितीच्या अध्यक्षपदी अकमलची अलीकडेच नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर अकमलने निवृत्ती जाहिर केली आहे. सध्या तो पेशावर जालिमीसाठी तात्पुरता फलंदाजी सल्लागार म्हणून काम करत आहे. तसेच आपल्या नवीन भूमिकांकडे लक्ष वळवण्यासाठी तो आता खेळाडू म्हणून पाकिस्तान सुपर लीगचा भाग राहणार नाही,असे अकमलने (Kamran Akmal) सांगितले. तसेच निवडक आणि प्रशिक्षक म्हणून माझ्याकडे आलेल्या नव्या जबाबदाऱ्यांमुळे मी आता क्रिकेट खेळू शकणार नाही, असे देखील त्याने प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. 


कारकिर्द 


कामरान अकमलने (Kamran Akmal) 2002 मध्ये पदार्पण केल्यापासून पाकिस्तानसाठी 53 कसोटी, 157 एकदिवसीय आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 2648 धावा, एकदिवसीय सामन्यात 3236 धावा आणि T20 मध्ये 987 धावा केल्या आहेत. त्याच्या यादीत 6 कसोटी शतके आणि 5 एकदिवसीय शतकांसह 12 अर्धशतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.अकमलने एप्रिल 2017 रोजी शेवटचा सामना खेळला होता.


दरम्यान कामरान अकमलच्या (Kamran Akmal) या निवृत्तीने पाकिस्तानी फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.