Kane Williamson: ...आणि हसतमुख केनच्या चेहऱ्याचा रंगच उडाला; सामन्यात नेमकं असं काय घडलं?
Kane Williamson: पहिल्या टेस्टमध्ये चांगला खेळ करणारा टीमचा महत्त्वाचा खेळाडू केन विलियम्सन ( Kane Williamson ) देखील स्वस्तात माघारी परतला. यावेळी विकेट गेली तेव्हा केनच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती.
Kane Williamson: वर्ल्डकप हातातून निसटला असो किंवा सेमीफायनलमध्ये टीमचा पराभव झाला असो, न्यूझीलंडच्या टीमचा कॅफ्टन केन विलियम्सनच्या ( Kane Williamson ) चेहऱ्यावर नेहमी हसू असतं. मात्र बांगलादेशासोबत सुरु असलेल्या सामन्यात एक अशी घटना घडली की, न्यूझीलंडचा खेळाडू केन विलियम्सनच्या ( Kane Williamson ) चेहऱ्यावर निराशाजनक भाव उमटले होते. पाहूयात सामन्यादरम्यान केन विलियम्ससोबत नेमकं काय घडलं.
दुसऱ्या टेस्ट सामन्यात बांगलादेशाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी बांगलादेशाची संपूर्ण टीम 172 रन्सवर ऑलआऊट झाली. यावेळी न्यूझीलंडच्या टीमचाही खेळ काही चांगला झाला नाही. अशातच पहिल्या टेस्टमध्ये चांगला खेळ करणारा टीमचा महत्त्वाचा खेळाडू केन विलियम्सन ( Kane Williamson ) देखील स्वस्तात माघारी परतला. यावेळी विकेट गेली तेव्हा केनच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती.
शहादत हुसैनची उत्तम फिल्डींग
बांगलादेशाच्या फलंदाजीनंतर न्यूझीलंडची टीम फलंदाजीला उतरली खरी, मात्र टॉप ऑर्डरचे किवी फलंदाज फेल गेले. यावेळी केन विलियम्सन ( Kane Williamson ) फलंदाजीला उतरला. केनकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती, मात्र उत्तम फिल्डींगमुळे केनला मोठी खेळी करता आली नाही. मेहंदी हसन मिराज 12 वे ओव्हर टाकायला आला. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर केनला ( Kane Williamson ) जास्त बाऊंस सांभाळता आला नाही आणि बॉल त्याच्या बॅटच्या कडेला लागून शॉर्ट लेग एरियात गेला. या ठिकाणी शहादत हुसैनने दमदार फिल्डींग करत अप्रतिम कॅच घेतला.
कॅच पकडल्याचं पाहताच टेस्ट टीमचा माजी कर्णधार केन विलियम्सनच्या ( Kane Williamson ) चेहरा पूर्णपणे उतरला. केन एक असा खेळाडू आहे, ज्याच्या चेहऱ्यावर निराशा क्वचितपणे दिसून येते. त्याच्या चेहरा नेहमी हसतमुख असतो. मात्र या सामन्यात चाहत्यांना केन फार दुःखी दिसून आला. विलियम्सन 14 बॉल्समध्ये 13 रन्स करून बाद झाला.