मुंबई : सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडची चमक पुन्हा एकदा दिसून आली. आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत फ्लॉप ठरलेल्या ऋतुराजने या सामन्यात 99 रन्सची धडाकेबाज खेळी केली. मात्र, यावेळी त्याचं शतक अवघ्या एका रन्सने हुकले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खेळीनंतर ऋतुराज फारच हताश आणि निराश दिसत होता. अशा परिस्थितीत या युवा फलंदाजाला विरोधी टीमचा कर्णधार केन विलियम्सनने पाठिंबा दिला.


ऋतुराज गायकवाडने त्याच्या खेळीमध्ये सहा फोर आणि तितकेच सिक्स लगावले. त्याने डेविन कॉनवे 85 (55) सोबत पहिल्या विकेटसाठी 182 रन्सची पार्टनरशिप केली. 20व्या ओव्हरमध्ये रुतुराज शतकापासून फक्त एक रन दूर असताना टी नटराजनने त्याची विकेट घेतली. भुवनेश्वर कुमारंही त्याचा कॅच पकडल्यानंतर फार खूश दिसला नाही. 


ऋतुराज शतकाच्या इतक्या जवळ असतना हुकला यामुळे प्रेक्षकंही हळहळले. काही क्षण पिचवर थांबून निराश होत ऋतुराज पव्हेलियनकडे जात असताना केन विलियम्सनलाही रहावलं नाही. तातडीने केन ऋतुराज जवळ आला आणि चांगल्या खेळीबद्दल त्याची पाठ थोपटली. हैदराबादच्या इतर खेळाडूंनीही ऋतुराजच्या खेळीचं कौतुक केलं.




दरम्यान सोशल मीडियावर केन विलियम्सनच्या कृत्याची सगळीकडे चर्चा होताना दिसतेय. केनने ऋतुराजची पाठ थोपटल्याचा फोटो व्हायरस झाल्यानंतर त्याचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय.