मुंबई : मुंबई इंडियन्सविरूद्ध झालेल्या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. सनरायझर्स टीमचा कर्णधार केन विलियम्सन आयपीएल सोडून मायदेशी परतला आहे. सनरायझर्स हैदराबाद अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर आता आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये केन विलियम्सन खेळणार नाहीये. विलियम्सन कौटुंबिक कारणामुळे आयपीएलची स्पर्धा मध्येच सोडून जाणार आहे.


सनरायझर्स हैदराबादने यासंदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये नमूद केल्यानुसार, आमचा कर्णधार केन विलियम्सन न्यूझीलंडला परत जात आहे. लवकरच त्यांच्या कुटुंबात एक नवीन पाहुणा येणार आहे. सनरायझर्स कॅम्प केन विल्यमसन आणि कुटुंबाला खूप शुभेच्छा देतं.



सनरायझर्स हैदराबादचे 13 सामन्यांतून एकूण 12 पॉईंट्स मिळवले आहेत. मात्र त्यांचं रनरेट -0230 आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी 22 मे रोजी त्यांचा सामना पंजाब किंग्जशी सामना होईल.