T20 World Cup 2022 : एडिलेडमध्ये झालेल्या सामन्यात आज न्यूझीलंड विरूद्ध आयर्लंड (NZvsIRE)  यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारत 35 रन्सने आयर्लंडचा पराभव केला. या विजयाने न्यूझीलंडने (T20 World Cup 2022) जवळपास सेमीफायनल गाठलं आहे. पहिल्यांदा फलंदाजी करत 186 रन्सचं लक्ष्य आयर्लंडला दिलं होतं. मात्र आयर्लंडला 150 पर्यंत मजल मारता आली. मात्र या सामन्यात चर्चेचा विषय ठरला तो न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही सामन्यांमध्ये फेल ठरलेल्या केनची बॅट आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात तळपली. एडिलेडच्या मैदानावर केन विलियम्सन नावाचं तुफान आलं होतं. गेल्या काही सामन्यांमध्ये खराब फॉम असलेल्या केनवर अनेक टीका झाल्या. मात्र आज केनने 35 बॉल्समध्ये 61 रन्स करत आक्रामक खेळी केली. यामध्ये त्याने 5 फोन आणि  3 सिक्स लगावल्या. 


इतकंच नाही तर केनने आयरीश गोलंदाजांवर थोडीही दया दाखवली नाही. 18 व्या ओव्हरमध्ये त्याने तुफान आणलं. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज बॅर्री मॅक्कार्थी 18 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमध्ये केनने दोन सिक्स आणि एका फोरचा समावेश आहे. फार क्वचित लोकांनी केनचं हे रौद्र रूप पाहिलं असेल. आयसीसीने केनच्या या फलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावक शेअर केला आहे.



गेल्या काही दिवसांपासून वाईट फॉर्ममध्ये असलेल्या केनचं फॉर्ममध्ये परतणं न्यूझीलंडच्या टीमसाठी खूप महत्त्वाचं आहे. सेमीफायनलमध्ये केनचा असा अंदाज विरोधी टीमसाठी धोकादायक ठरू शकतो. 


सेमीफायनलमध्ये टीम इंडिया इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाशी भिडणार?


आयर्लंडविरुद्धच्या विजयासह न्यूझीलंड ग्रुप मध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. या विजयामुळे भारताला सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करावा लागणार नाही. कारण भारत सध्या ग्रुप 1 मध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी 4 पैकी 3 सामने जिंकले असून 6 पॉईंट्ससह पहिल्या स्थानावर कायम आहे. 


6 नोव्हेंबरला होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा पराभव केल्यास ते 2 पॉईंट्ससह अग्रस्थानी राहतील. सेमीफायनलमध्ये त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडशी होण्याची शक्यता आहे. 


ग्रुप 1 मधील अव्वल टीम सेमीफायलनमध्ये ग्रुप 2 मधील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या टीमशी भिडणार आहे. त्याचवेळी, ग्रुप 1 मधील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या टीमचा सेमीफायनलमध्ये ग्रुप 2 मधील अव्वल स्थानावर असलेल्या टीमशी सामना होणार आहे.