मुंबई : सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. त्याच्या या खराब फॉर्ममुळे त्याला सोशल मीडियावर अनेक टीकांचा सामना करावा लागतोय. कालच्या सामन्यात 11 बॉलमध्ये 4 रन्स केले. यानंतर त्याने हैदराबाद टीमचं कर्णधारपद सोडण्याची मागणी केली जातेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालच्या सामन्यात मुळात केनने टॉस जिंकून प्रथम दिल्लीला फलंदाजी करण्याची संधी दिली. मात्र त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटला. दिल्लीकडून देण्यात आलेल्या 208 रन्सच्या लक्षाचा पाठलाग करताना हैदराबादला केवळ 186 रन्स करता आले. यामध्ये कर्णधार म्हणून केनने 4 रन्सचं योगदान दिलं. 







यावेळी सोशल मीडियावर युझर्सने त्याला पुढच्या सामन्यात स्वतःला ड्रॉप करण्याचा सल्ला दिला आहे. तर एका युझरने म्हटलंय की, माझा 5 वर्षांचा मुलगा केन विलियम्सनपेक्षा चांगली फलंदाजी करतो. 



तर केन विलियम्सनला जराशी लाज असेल तर त्याने पुढच्या सामन्यात तो बेंचवर बसेल, अशीही त्याच्यावर टीका करण्यात आलीये. याशिवाय एक युझरने, केन विलियम्सनने कर्णधारपद सोडून मारक्रमकडे धुरा द्यावी, असं सांगितलं आहे. तसंच केनने संपूर्ण टीमची वाईट परिस्थिती केली असल्याची सडकून टीका करण्यात आली आहे.