IPL 2023 Kane Williamson Ruled Out : शुक्रवारपासून आयपीएलच्या (IPL 2023) थराराला सुरुवात झाली असून पहिला सामना गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) जिंकला. मात्र या सामन्यानंतर गुजरातच्या टीमला एक मोठा धक्का बसला आहे. टीममधील एक मॅचविनर खेळाडू संपूर्ण लीगमधून बाहेर पडल्याची माहिती मिळालीये. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणीही नसून गुजरात टायटन्सचा खेळाडू केन विलियम्सन (Kane Williamson) आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या सामन्यात गुजरातने चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सने पराभव केला. मात्र या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सच्या टीमला एक मोठा धक्का बसला. हा धक्का म्हणजे, केन विलियम्सनला मोठी दुखापत झाली आणि तो संपूर्ण लीग खेळू शकणार नाहीये. स्पोर्ट्स तकने याबाबत माहिती दिली आहे.  


Kane Williamson बाहेर


गुजरात टायटन्सचा मॅच विनर खेळाडू केन विलिम्सनला संपूर्ण आयपीएल सीझनमधून वगळण्यात आल्याची बातमी स्पोर्ट्स तकने दिलीये. या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे तो आयपीएल खेळू शकणार नाही. त्यामुळे गुजरातच्या टीमला हा मोठा धक्का मानला जातोय.


कसा दुखापतग्रस्त Kane Williamson 


शुक्रवारच्या सामन्यामध्ये फिल्डींग करताना केनला दुखापत झाली होती. 13 व्या ओव्हरमध्ये जोशुआ लिटल गोलंदाजी करताना गायकवाडने मोठा शॉट खेळला. यावेळी बाऊंड्री लाईनजवळ केन विलियम्सन उभा होता. केनने उडी मारून बॉल पकडला खरा  मात्र बाऊंड्री लाईनच्या बाहेर पडत असल्याचं समजताच त्याने बॉल फेकला. उडी मारून खाली आल्यानंतर त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला जबर दुखापत झाली.


दुखापत झाल्यानंतर केनला चालताही येत नव्हतं. दुखापत झाल्यानंतर तातडीने त्याची तपासणी करण्यासाठी फिजिओला बोलावण्यात आलं. यावेळी केन वेदनेने कळवळत होता. इतकंच नाही तर दोन खेळाडूंनी केनला ड्रेसिंग रूममध्ये नेलं. मात्र केनची दुखापत गंभीर असून तो आता पुढची संपूर्ण लीग खेळू शकणार नाहीये.


साई सुदर्शन बनला इम्पॅक्ट प्लेअर


गुजरात टायटन्सने साई सुदर्शनला त्यांचा पहिला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवलं. गुजरात फलंदाजी करत असताना केन विलियम्सनची जागा सुदर्शनने घेतली. विलियम्सनला दुखापत झाल्यानंतर तो सामन्यातून बाहेर पडला.