मुंबई : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज राजीनामा दिल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौतने ट्विटरच्या माध्यमातून अनिल देशमुखांवर निशाना साधला आहे. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, अनिल देशमुख यांनी आताच आपला राजीनामा दिला आहे. ही माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना राणौत आपल्या मनातील विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम ठेवत आली आहे. 2020 मध्ये कंगनाने सोशल मीडियावरुन महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप केले आहेत. हे सगळ घडल्यानंतर अनिल देशमुखयांनी असे वक्तव्य केले होते की,  "कंगनाला येथे राहण्याचा अधिकार नाही."  आता अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर कंगना राणौतने त्यांना उपदेश दिले आहेत.


कंगनाचे ट्विट


कंगनाच्या एका चाहत्याने सप्टेंबर २०२० मधील कंगनाच्या व्हीडिओला ट्विट केला आहे, हा व्हीडिओ त्या वेळेचा आहे, जेव्हा बीएमसीने कंगनाच्या ऑफिसची तोडफोड केली होती. त्यावर चाहत्याने कंगनाला सपोर्ट केला आहे. कर्माची फळे त्यांना मिळाली, असे ही त्या व्हीडिओवर लिहिले. यानंतर कंगनाने त्या व्हीडिओला रीट्विट करत, महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर निशाना साधला.


तिच्या सपोर्टसच्या ट्ववीटला रिट्वीट करून कंगनाने म्हटलं आहे, "साधूंना ठार मारणाऱ्यांचा आणि स्त्रीचा अपमान करणार्‍यांचा अंत निश्चित आहे. पुढे पाहा आणखी काय काय घडतं ते." हे वाक्य तिने अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांना ही टॅग करुन लिहिले आहे.


या ट्विटद्वारे कंगना राणौतला हेच अनिल देशमुख यांना खूनवायचं होतं की, तिच्या सोबत ते जे काही वाईट वागले आहेत. त्याचीच शिक्षा त्यांना मिळाली आहे. कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. यावर यूझर्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.



अनिल देशमुख यांच्यावर कोणते आरोप?


महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर नुकतेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटी रुपयांचा हफ्ता वसुलीचा आरोप केला होता. या प्रकरणी जनहित याचिका सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविली आहे. एवढेच नव्हे तर कोर्टाने सीबीआयला 15 दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यांच्या चौकशीत काही तथ्य समोर आल्यास पुढील कारवाई करा.


या निर्णयानंतरच अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. या सगळ्या प्रकरणात आता महाराष्ट्र सरकारचा त्रास आणखी वाढण्याची शकता आहे.