Kapil Dev Record: भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव  (Kapil Dev Birthday) यांचा आज वाढदिवस आहे.या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रिकेटसह इतर विविध क्षेत्रातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. कपिलने त्यांच्या कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड केले. 1983 चा वर्ल्डकप (1983 World Cup) देखील कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) जिंकला होता. दरम्यान कपिल देव यांच्या नावे असलेला एक रेकॉर्ड कोणत्याच खेळाडूला मोडता आला नाही आहे.हा रेकॉर्ड काय आहे, तो जाणून घ्या. 


हे ही वाचा : अर्शदीपच्या नो बॉलवर कर्णधार Hardik Pandya संतापला, मैदानावरचा VIDEO व्हायरल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


रेकॉर्ड काय? 


भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी केल्या आहेत. पण कपिलचे असे काही विक्रम आहेत, जे आजपर्यंत जगातील कोणताही खेळाडूला ब्रेक करता आले नाही आहेत.कपिल देव यांच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक विशेष रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. कपिलने एका सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने एका सामन्यात नाबाद 175 धावा केल्या. हा त्यांचा रेकॉर्ड आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला मोडता आला नाही आहे. टीम इंडियाचे सोडाच अगदी प्रतिस्पर्धी खेळाडू देखील हा रेकॉर्ड मोडण्यात अपयशी ठरले आहेत. 


 सहाव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे खेळाडू


  • 175* - कपिल देव

  • 143* - सायमंड्स

  • 139* - महेंद्रसिंग धोनी

  • 129 - जोस बटलर


या खेळाडूंचे प्रयत्न अपयशी 


कपिल देव (Kapil Dev)यांचा रेकॉर्ड मोडण्याचा अनेक खेळाडूंनी प्रयत्न केला होता.मात्र या प्रयत्नात ते अपयशी ठरले होते. ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू अँड्र्यू सायमंड्सने हा रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न केला होता.मात्र तो अपयशी ठरला होता. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने नाबाद 143 धावा केल्या. या धावाकरून तो दुसऱ्या स्थानावर आहे. 


धोनी दुसरा भारतीय खेळाडू


कपिलच्या या (Kapil Dev) विक्रमाचे महेंद्रसिंग धोनीशी खास नाते आहे. खरं तर, वनडे फॉरमॅटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारा धोनी हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. तो जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने एका सामन्यात नाबाद 139 धावा केल्या. या बाबतीत, जोस बटलर जागतिक खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. बटलरने 129 धावा केल्या आहेत.


दरम्यान कपिलचा (Kapil Dev) हा रेकॉर्ड आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला मोडता आला नाही.अगदी टीम इंडियाचे खेळाडू सोडा, प्रतिस्पर्धी खेळाडूंना देखील हे जमले नाही आहे.