रोहित शर्मा चुकतोय! `या` कारणामुळे टीम इंडिया होऊ शकते वर्ल्ड कपमधून बाहेर, Kapil Dev म्हणतात...
Kapil Dev On Jasprit Bumrah : टीम इंडिया टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दमदार प्रदर्शन करत असताना आता कपिल देव यांनी रोहितला (Rohit Sharma) मोलाचा सल्ला दिलाय.
IND vs USA : सध्या युएसएमध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) टीम इंडियाचं दमदार प्रदर्शन पहायला मिळतंय. आयर्लंडविरुद्धचा सोपा सामना टीम इंडियाने खिशात घातलाच पण पाकिस्तानविरुद्ध देखील टीम इंडियाने हातातून निसटणारा सामना जिंकला. दोन्ही सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलाय जसप्रीत बुमराह... आयर्लंडविरुद्ध बुमराहने (Jasprit Bumrah) 3 ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या अन् 2 गडी बाद केले. तर पाकिस्तानविरुद्ध बुमराहने 4 ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या अन् 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे बुमराहची गोलंदाजी टीम इंडियासाठी हुकमी एक्का ठरत आहे. अशातच आता माजी वर्ल्ड कप विजेते कॅप्टन कपिल देव (Kapil Dev) यांनी रोहित शर्माला अशी चूक दाखवून दिलीये, ज्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर देखील पडू शकते.
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माची रणनिती खूप वेगळी ठरलीये. सलामीसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली आल्याने समोरच्या गोलंदाजांवर प्रेशर निर्माण होतंय. तर रोहितने दोन्ही स्टार ऑलराऊंडरला संघात स्थान दिलंय. यामध्ये शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे. तर फास्टर गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या तिघांची तिघडी कायम ठेवलीये. पण रोहित शर्मा आणखी एक डावपेच आखतोय. तो म्हणजे गोलंदाजी क्रमामध्ये बदल करून... रोहितने अर्शदीप आणि मोहम्मद सिराज यांच्याकडून गोलंदाजीला सुरुवात करून घेतोय. तर बुमराह पावर प्लेच्या अखेरीस गोलंदाजीची कमान सांभाळतोय, यावरच आता कपिल देव यांनी आक्षेप घेतला आहे.
Kapil Dev काय म्हणाले?
खेळपट्टी कशी आहे? यावरून काहीही फरक पडत नाही. बुमराहला पहिली ओव्हर देणं आवश्यक आहे. रोहितच्या निर्णयावर मला नक्कीच अचंबित केलंय. पण कॅप्टनच्या काही रणनिती असतात. मी जेव्हा रोहितला भेटेल तेव्हा नक्कीच यावर चर्चा करेल. त्याच्या डोक्यात नेमकं काय चाललंय? यावर मला चर्चा करायला आवडेल. कारण प्रमुख गोलंदाजाला पहिली ओव्हर देणं आवश्यक असतं. तो तुम्हाला सुरूवातीलाच विकेट घेऊन देऊ शकतो. तर तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या गोलंदाजाच्या वापरानंतर बुमराहला बॉलिंगल उतरवत असाल तर सामना हातातून निसटण्याची शक्यता असते, असं कपिल देव यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.
दरम्यान, कपिल देव यांनी यावेळी ऋषभ पंतवर देखील आश्चर्याचकित करणारं वक्तव्य केलं. ऋषभ पंतमध्ये (Rishabh Pant) नक्कीच टॅलेंन्ट आहे. पण आत्ताच त्याचं कोणाशीही तुलना करू शकत नाही. त्याला संघात घेऊन जरा घाईच केली, असं स्पष्ट मत कपिल देव यांनी मांडलं आहे. आयपीएलमध्ये त्याला खेळताना पाहून तुम्ही त्याला संघात स्थान दिलं. पण त्याला थोडा वेळ द्यायला हवा होता. तो मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे, असं कपिल देव यांनी म्हटलं आहे.