न्यूयॉर्क : अमेरिकेच्या 'एल साल्वाडोर' या देशामध्ये सर्फिंग करतेवेळी, एका महिला खेळाडूचा वीज पडून मृत्यू झाला आहे. 22 वर्षीय या महिला खेळाडूचं नाव कॅथरीन डायझ हर्नंडेझ असं आहे. एका वृत्तानुसार, सर्फिंग करतेवेळी कॅथरिनच्या डोक्यावर वीज पडली आणि तिचा मृत्यू झाला. कॅथरीन डायझ ही 'अल साल्वाडोर' या राष्ट्रीय सर्फिंग संघात होती.


ऑलिम्पिकसाठी कॅथरिन खूप मेहनत घेत होती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅथरीन डायझ टोकियो ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाई होण्यासाठी बरीच मेहनत घेत होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्फिंग खेळाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. एका वृत्तानुसार, शुक्रवारी कॅथरीन डायझ पॅसिफिक महासागरातून सर्फिंग करुन परतत असताना अल टुंको बीचवर तिच्या डोक्यात वीज पडली. वीज कोसळल्यानंतर कॅथरिन डायझचा मृत्यू झाला. कॅथरीनला रुग्णालयात नेत असतानाचं वाटतेच तिनं अखेरचा श्वास घेतला.


कॅथरीनचे शरीर बरंच जळून खाक


कॅथरीनचे शरीर बरंच जळून खाक झालं होतं.  एल साल्वाडोरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचे प्रमुख यामिल बुकेले यांनी ट्विट करत लिहिले आहे की, ''या घटनेमुळे मला अतिशय दुःख झालं आहे. अशा वेळी मी कॅथरीनच्या कुटुंबासह आणि तिच्या मित्रांसोबत आहे''.


त्याचबरोबर कॅथरीनची टीममधली सहकारी जोसलिन अलाबी म्हणाली की, ''तिचं निघून जाणे हे फारच वेदनादायक आहे आणि त्याचा खोल परिणाम माझ्यावर झाला आहे''. कॅथरीन डायझ देखील पेशाने शेफ होती. ती संध्याकाळी हॉटेलमध्ये स्वयंपाक करायची आणि सकाळी ती सराव करायची'' सर्फिंग हा समुद्रात खेळला जाणारा खेळ आहे. या गेममध्ये एका बोर्डच्या माध्यमातून समुद्राच्या लहरींवर खेळालं जातं.