VIDEO : पाकिस्तानला हरवल्यानंतर Team India सोबत केदार जाधवचा Dance
केदार जाधव या गाण्यात शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारचं गाणं `चुराके दिल मेरा...` या गाण्यावर डान्स करताना दिसतोय.
मुंबई : रविवारी टीम इंडियाने पाकिस्तानला क्रिकेट सामन्यात धूळ चारली. यामुळे पाकिस्तानची टीम आशिया कपच्या बाहेर झाली आहे. तसं पाहिलं तर भारत पाकिस्तानचा क्रिकेट सामना दोन्ही देशातील कोट्यवधी दर्शकांसाठी कुतूहलच असतं. टीम इंडिया, पाकिस्तानला हरवत, आशिया कप फायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे. फायनलमध्ये पोहचणे आणि पाकिस्तानला हरवणे, याचा आनंद टीम इंडियाने मोठ्या उत्साहात साजरा केला.
हा आनंद साजरा करताना केदार जाधवने जोरदार डान्स केला. केदार जाधवचा हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या दिवशी टीम इंडियाचा अंबाती रायडू याचा वाढदिवस होता. सामना जिंकल्यानंतर टीमने अंबाती रायडूचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा केला, महेंद्रसिंह धोनीसह इतर खेळाडूंनी रायडूला खूपसारा केक लावला.
याच दरम्यान वाढदिवसाच्या या उत्साहात, क्रिकेटर केदार जाधवने जोरदार डान्स केला. केदार जाधव या गाण्यात शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारचं गाणं 'चुराके दिल मेरा...' या गाण्यावर डान्स करताना दिसतोय.
पाकिस्तानच्या विरोधात टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनने जोरदार बॅटिंग करत, पाकिस्तानच्या टीमला लोळवलं. रोहित आणि शिखरने शतकी खेळी केली. यासोबत दोन्ही जणांनी आपलं रेकॉर्ड नावे केलं. शिखर धवनने आपलं पंधरावं शतक साजरं केलं.