वर्ल्डकपआधी भारतासाठी बॅडन्यूज, या खेळाडूला दुखापत
आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूला दुखापत
मुंबई : चेन्नईकडून खेळणारा केदार जाधवच्या डाव्या खांद्याला दुखापत झाल्यानं आगामी त्याला आगामी सामन्यांना मुकावं लागण्याची शक्यता आहे. त्याहीपेक्षा विश्वचषकापर्यंत तो बरो होईल का अशी चिंता भारतीय क्रिकेटचाहत्यांना भेडसावते आहे. पंजाबविरुद्धच्या लढतीत केदार जाधवच्या खांद्याला दुखापत झाली आहे.
केदारच्या खांद्याचा स्कॅन आणि एक्सरे काढण्यात येणार असून त्यानंतर तो खेळू शकेल की नाही हे स्पष्ट होईल असं चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी सांगितलं आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात १४ व्या ओव्हरमध्ये ओव्हर थ्रो झालेला बॉल अडवण्यासाठी त्याने डाव्या बाजुला झेप घेतली. या प्रयत्नात त्याच्या डाव्या खांद्याला दुखापती झाली. यानंतर तो मैदानातून बाहेर गेला.
आयपीएलच्या पहिल्या प्लेऑफ क्वालिफायर मॅच मुंबई आणि चेन्नईमध्ये रंगणार आहे. पण या महत्त्वाच्या सामन्यात केदार खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.