IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने गुरुवारी झालेल्या IPL सामन्यात मुंबई इंडियन्सचा (MI) 3 गडी राखून पराभव केला. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचे (CSK vs MI) संघ जेव्हा जेव्हा आमने-सामने येतात तेव्हा प्रकरण केवळ संघापुरते मर्यादित नसते, तर दोन दिग्गजांमध्ये मजेदार लढतही होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलार्ड आणि ब्राव्हो यांच्यात टक्कर


चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्यादरम्यान, किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) आणि ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) यांच्यात अनेकदा मजेदार भांडणे पाहायला मिळतात. गुरुवारी मुंबई आणि चेन्नई यांच्यात सामना सुरू असताना, किरॉन पोलार्डच्या फलंदाजीदरम्यान ड्वेन ब्राव्होने बॉल थ्रो केला. त्यानंतर किरॉन पोलार्डच्या प्रतिक्रियेने सर्व लोक प्रभावित झाले.


मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीदरम्यान किरॉन पोलार्ड स्ट्राइकवर असताना, 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ब्राव्होच्या चेंडूवर पोलार्डने बचावात्मक शॉट खेळला. त्यानंतर ब्राव्होने चेंडू उचलला आणि थेट पोलार्डच्या दिशेने फेकला. पोलार्डने बॅटने चेंडू रोखला.


पोलार्डने अशी दिली प्रतिक्रिया


यानंतर ब्राव्हो मजेशीर पद्धतीने पोलार्डशी लढायला गेला, पण ब्राव्होवर राग येण्याऐवजी पोलार्डने त्याच्या डोक्यावर चुंबन घेतले. पोलार्ड आणि ब्राव्होचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मैदानावर ब्राव्हो आणि पोलार्ड यांच्यात मजेदार क्षण घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. ब्राव्हो आणि पोलार्ड हे चांगले मित्र आहेत आणि हे दोन खेळाडू अनेकदा मैदानावर असे मैत्रीपूर्ण क्षण शेअर करताना दिसले आहेत.



मुंबई इंडियन्सचा सलग सातवा पराभव


गुरुवारी झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सला सलग सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात किरॉन पोलार्ड अवघ्या 14 धावा करून बाद झाला. चेन्नई सुपर किंग्जने हा सामना ३ विकेटने जिंकला.