मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे खूप मोठं नुकसान आणि अनेक संकट निर्माण झाले आहेत. IPLमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्यानं पुढचे सामने स्थगित करावे लागले. तर दुसरीकडे क्रीडा-मनोरंजन विश्वातील अनेक ज्येष्ठ आणि चांगल्या व्यक्ती कोरोनानं हिरावून नेल्या आहेत.


एका बॉलवर ते एखाद्या खेळाडूची क्षमता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टायगर नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि बीसीसीआय माजी निवड समितीचे प्रमुख किशन रूंगटा यांचंही कोरोनामुळे नुकतंच निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे क्रिकेटविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते खूप शिस्तप्रिय आणि अचून निरीक्षण करणारे होते. एका बॉलवर ते एखाद्या खेळाडूची क्षमता किती आहे हे ओळखायचे.


वर्तवलेलं भाकित तितकच खरं ठरलं


किशन रूंगटा जे सांगितलं ते आजपर्यंत खरं झालं नाही असं नाही. त्यांनी एकदा पंकज सिंहच्या बॉलिंगची ट्रायल घेतली. तेव्हा पहिल्याच बॉलनंतर तो टीम इंडियात जाणार हे भाकित नोंदवलं आणि ते खरं देखील झालं. त्यांच्या इतकं अचूक निरीक्षण आणि शिस्तीचं कसब खूपच कौतुकास्पद होतं. भज्जीच्या बाबतील देखील त्यांनी वर्तवलेलं भाकित तितकच खरं ठरलं.


द्रविड आणि सौरव गांगुली यांच्यासोबत घडलेला किस्सा


चर्चेत आहेत, तो म्हणजे द्रवीड आणि सौरव गांगुली यांच्यासोबत घडलेला किस्सा. घडलं असं की, 1996 च्या इंग्लंड दौर्‍यासाठी सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली होती. ही निवड हाय प्रोफाइल होती. त्यामुळे त्याची चर्चाही तेवढीच होती. यावर त्यावेळीचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन मात्र काहीसा नाराज होता.


अझरुद्दीन मात्र गांगुली आणि द्रवीड यांच्या येण्यानं खूश नव्हता.गांगुलीला न घेण्यावर तो ठाम होता. त्याच्या मताशी कोणीही सहमत नाही हे पाहून तो बैठकीतून उठून चिडून निघून गेला.


अझरुद्दीनला समजवण्याची विनंती


त्यावेळी जगमोहन दालमिया यांनी किशन यांना अझरुद्दीनला समजवण्याची विनंती केली. त्यांनी खूप वेळ अझरुद्दीनची समजून काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी किशन यांनी त्यांचा निर्णय सांगून ते ताडकन निघून गेले. 'अझर तुमच्याकडे पाच मिनिटं विचार करायला वेळ आहे. एकतर तू ये किंवा तू नाही आलास तर तुझ्याशिवाय टीम इंग्लंड दौऱ्यावर जाईल.'


अझर तुझ्याकडे पाच मिनिटं विचार करायला वेळ


किशन यांच्या या एका वाक्यानंतर मोहम्मद अझरुद्दीन ताडकन उठला आणि त्याने निवड समितीच्या पत्रावर सही केली. गांगुली आणि द्रविड यांनी मिळून जी कामगिरी केली त्याचा संपूर्ण जग साक्षीदार आहेच. हा किस्सा देखील त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता. यावरून त्यांची शिस्त, रुबाबत आणि योग्य ठिकाणी असणारा वचक कसा होता यावरून आपल्याला अंदाज लावायला हरकत नाही.