मुंबई : आयपीएल 2022 चे सामने अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. तयारीही सुरू झाली आहे. यंदा 10 संघात 70 सामने खेळवण्यात येणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक जोड्या फुटल्या आहेत. अनेकांचे संघ बदलले आहेत. त्यामुळे यंदाची आयपीएल अधिक चुरशीची होणार आहे. या आयपीएलमध्ये कोलकाताच्या क्रिकेटपटूनं अजब रेकॉर्ड केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाच्या लिमिटेड ऑव्हर्सचा कर्णधार एरोन फिंचसाठी एक मोठी बातमी आहे. आयपीएलमध्ये तो यावर्षी कोलकाता संघाकडून खेळताना दिसणार आहे. एकूणच आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामात तो 9 संघाकडून खेळला आहे. 9 संघांमधून खेळणारा एरोन पहिला खेळाडू बनला आहे. त्याच्या नावावर हा अजब रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे. 


फिंचची 9 वी कोलकाता टीम असणार आहे. यापूर्वी तो दिल्ली, गुजरात लॉयन्स, पंजाब टीम, मुंबई इंडियंस, पुणे वॉरियर्स, राजस्थान रॉयल्स, बंगलुरु आणि सनराइजर्स हैदराबाद संघामध्ये खेळला आहे.


3 तीन संघांमध्ये फिंचला खेळण्याची संधी मिळाली नाही
चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, लखनऊ यापैकी गुजरात टायटन्स आणि लखनऊ या नव्या दोन टीम पहिल्यांदाच 2022 मध्ये आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उतरणार आहेत. चेन्नईनं आतापर्यंत 4 वेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. 


फिंच आयपीएल मेगा ऑक्शन 2022 मध्ये अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर कोलकाता संघातील एलेक्स हेल्सनं माघार घेतल्यानं त्याच्या जागेवर फिंचला घेण्यात आलं. त्याने एकूण 87 सामने खेळले आहेत. 


आयपीएलची सुरुवात 26 मार्चपासून होणार आहे. 29 मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना CSK विरुद्ध KKR होणार आहे. चेन्नईचा कर्णधार धोनी तर कोलकाता संघाचं कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे असणार आहे.