Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad : कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 च्या फायनल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव केला अन् आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. तिसऱ्यांदा कोलकाताने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलंय. चॅम्पियन कोलकाताने आपल्या धातक गोलंदाजीच्या जोरावर तगड्या हैदराबादला गुडघ्यावर आणलं अन् कॅप्टन श्रेयस अय्यरच्या आयपीएलची ट्रॉफी पुन्हा एकदा उंचावली. व्यंकटेश अय्यरच्या आक्रमक खेळाच्या जोरावर हैदराबादने दिलेलं 114 धावांचं आव्हान कोलकाताने आरामात पूर्ण केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाताचा यशस्वी रनचेस


हैदराबादने कोलकातासमोर किरकोळ 114 धावांचं आव्हान दिलं होतं. कॅप्टन पॅट कमिन्सने स्वत: लीड केली अन् केकेआरचा पहिला सलामीवीर सुनील नारायण याला तंबूत पाठवलं. मात्र, व्यंकटेश अय्यरने आक्रमक फलंदाजी सुरू केली अन् हैदराबादला डोकं वर काढू दिलं नाही. हैदराबादने सर्व डावपेट फसले गेले अन् अखेर कोलकाताने 57 बॉल राखून सामना खिशात घातला. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांना प्रत्येकी 1 विकेट घेता आली. तर कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने 52 धावांची खेळी केली.



केकेआरची घातक गोलंदाजी


टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय हैदराबादच्या मुळावर उठला. दोन्ही सलामीवीर ज्यांच्या खांद्यावर हैदराबादची फलंदाजी होती, त्यांनी सुरूवातीलाच हत्यार टाकलं अन् हैदराबाद अडचणीत आली. मिचेल स्टार्क आणि वैभव अरोरा यांनी हैदराबादला पॉवर प्लेमध्ये तोंड वर काढू दिलं नाही. हैदराबादची टॉप ऑर्डर कोलकाताच्या गोलंदाजींनी मोडून काढली. पहिले चार फलंदाज तंबूत परतल्याने हैदराबादाचा धावगती फिसकटली. तेव्हाच श्रेयस अय्यरने आपल्या दोन स्पिनर्सला कामाला लावलं अन् हैदराबादची हवा टाईट केली. अखेर कॅट कमिन्स वगळता कोणाही फलंदाजाला मैदानात टिकता आलं नाही. पॅटने 24 धावा केल्या तर केकेआरकडून आँद्रे रसल याने 3 विकेट्स घेतल्या. मिशेल स्टार्क आणि हर्शित राणा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स खोलल्या.


सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: पॅट कमिन्स (कॅर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.


सनरायजर्स हैदराबाद इम्पॅक्ट खेळाडू: उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मारकंडे, अब्दुल समद आणि वॉशिंगटन सुंदर.


कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग ईलेव्हन: श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज़ (विकेटकीपर), सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.


कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट खेळाडू: अनुकूल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत आणि शेरफेन रदरफोर्ड.