IPL : RCB विरुद्ध पराभवानंतर KKR चा कर्णधार मॉर्गन म्हणतो, ही झाली चूक...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पराभवानंतर मॉर्गनची प्रतिक्रिया
अबुधाबी : नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीच्या निर्णयाबद्दल कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कर्णधार इयोन मॉर्गनने निराशा व्यक्त केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर आधी गोलंदाजी करायला हवी होती असं त्याने म्हटलं आहे.
सामन्यानंतर मॉर्गन म्हणाला की, ''मला वाटते की याची सुरुवात फलंदाजीने झाली. आम्ही चार-पाच विकेट लवकर गमवणे निराशाजनक होते. बंगळुरूने चांगली गोलंदाजी केली, परंतु आम्ही चांगले खेळू शकलो. दव फॅक्टरमुळे आम्ही प्रथम गोलंदाजी केली पाहिजे होती.'
या सामन्यात आंद्रे रसेल किंवा सुनील नरेन दोघेही नव्हते. या दोघांबद्दल इयोन मॉर्गन म्हणाला की, 'रसेल आणि नरेन फिट होतील आणि नंतर उपलब्ध असतील. हे उत्कृष्ट क्षमतेचे दोन महान खेळाडू आहेत. त्यांची अनुपस्थिती ही मोठी कमतरता आहे. '
सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमवून फक्त 84 धावा केल्या. त्याला उत्तर म्हणून आरसीबीने 13.3 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून विजय मिळवला. मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली आणि 4 ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले.
बंगळुरूने 10 पैकी 7 सामने जिंकल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये ते दुसर्या क्रमांकावर पोहचले आहेत. त्याचबरोबर पराभव झालेल्या केकेआरची टीम चौथ्या क्रमांकावर आहे.