मुंबई: देशात कोरोनाची लाट इतकी भयंकर होती की IPL 2021 ला देखील त्याचा मोठा फटका बसला. 29 सामने झाल्यानंतर कोरोनामुळे IPLचे उर्वरित 31 सामने स्थगित करावे लागले. कोलकाता संघाच्या खेळाडूला कोरोनाचा भयंकर अनुभव सांगताना हुंदका आला आणि पुढच्या काही मिनिटांत लाईव्ह मुलाखतीमध्ये अक्षरश: रडू कोसळलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वदेशात परतण्याआधी कोलकाताचा आणि न्यूझीलंड संघाचा विकेटकीपर टिम सायफर्ट  कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्याला 14 दिवस क्वारंटाइन व्हावं लागलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडला परतल्यानंतरही 14 दिवस क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्याने आपला अनुभव शेअर केला आहे. 


कोलकाता संघातील खेळाडूनं कोव्हिडदरम्यानचा सांगितलेला अनुभव ऐकण्यासाठी इथे क्लिक करा


न्यूझीलंड हेराल्डला दिलेल्या मुलाखतीदरम्यान टिमला रडू कोसळलं. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. टिम म्हणाला की, जेव्हा मला समजलं की माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तेव्हा एक क्षण मला संपूर्ण जग थांबल्यासारखं वाटलं. मला वास्तवात काय सुरू आहे याचा विचारच पुढचा करता येत नव्हता. डोकंच चालत नव्हतं सुन्न झाल्यासारखा होतो मी आणि ही अवस्था फार भयंकर असते. 


IPL 2021च्या नव्या शेड्युलमुळे India vs South Africa T20 सीरिज रद्द?


सर्वजण आपल्या घरी परतले होते मी एकटाच कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे क्वारंटाइन झालो होतो. त्यामुळे माझी हिम्मत जास्त खचली. संपूर्ण टूर्नामेंटनंतर मी एकटाच असा खेळाडू होतो जो भारतात क्वारंटाइन होतो. बाकी सर्व खेळाडू आपल्या घरी सुखरुप परतत होते. 


राहुल द्रविडची भीती का वाटते? पृथ्वी शॉनं सांगितलं कारण


मी बायो बबलमध्ये सुरक्षित असल्याचं फील करत होतो. आतापर्यंत भारता बद्दल खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या आणि त्या अनुभवल्याही. पुन्हा एकदा IPLसाठी किंवा टी 20 साठी भारतात जायची वेळ आली तर जाणार असल्याचंही टिम सायफर्टनं सांगितलं. 


टीम सायफर्टनं दिलेल्या मुलाखतीमध्ये बायोबबलवर त्याने केलेलं भाष्य हे ऑस्ट्रेलियन खेळाडूंपेक्षा वेगळं आहे. ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी बायो बबल सुरक्षित नाही म्हणत IPL 2021मधून माघार घेतली होती.