मुंबई : आयपीएलमध्ये आरसीबी विरुद्ध कोलकाता 3 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला आहे. श्रेयस अय्यरने एका स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे तो खेळाडू पुढचा सामना खेळणार की नाही याबाबत शंका आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयस अय्यरने वेगवान गोलंदाज आणि ऑलराऊंडर खेळाडू शिवम मावीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता टीमने शिवम मावीला 7.25 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. त्यावर दुसऱ्या टीमनेही बोली लावली होती. मात्र अखेर कोलकाता संघाला शिवमला आपल्या टीममध्ये घेण्यात यश आलं. 


शिवम सध्या खराब फॉर्ममध्ये आहे आणि त्याचा फटका संघाला बसला आहे. 2022 मध्ये चेन्नईला 6 विकेट्सने पराभूत करण्यात कोलकाता टीमला यश आलं. मात्र बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही सामन्यात शिवम मावी खास कामगिरी करू शकला नाही. 


बॉलिंगमध्ये त्याने विरोधी संघाला 35 धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेण्यात यश आलं नाही. 2021 मध्ये शिवमने कोलकातासाठी 9 सामने खेळले यामध्ये त्याने 11 विकेट्स घेऊन 25 धावा केल्या होत्या. 


कोलकाता टीम मजबूत होत आहे. मात्र बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात खराब फिल्डिंगमुळे त्यांना सामना गमवण्याची वेळ आली. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांनी खूप मजबूत गोलंदाजी केली.