Rinku Singh Flight Video: नुकत्याच झालेल्या आयपीएल (IPL 2023) सामन्यातून कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) संघ लीग स्टेजमधून बाहेर पडला. कोलकाता नाईट रायडर्सला प्लेऑफमध्ये जागा मिळवता आली नाही. मात्र, केकेआरचा स्टार प्लेयर रिंकू सिंह (Rinku Singh) याने सर्वांची मनं जिंकली आहे. गुजरातच्या यश दयाल याला 5 बॉलमध्ये 5 सिक्स खेचत रिंकूने सामना जिंकवला होता. त्यानंतर रिंकूची क्रेझ चांगलीच वाढली. अशातच आता फ्लाइटमध्ये रिंकू सिंगची वाईट अवस्था झाली आहे. त्याचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिंकू सिंग (Rinku Singh) सध्या मालदीवमध्ये असून सुट्टीचा आनंद घेत आहे. अशातच रिंकू सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रिंकू सिंग खूपच घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. कोलकाता नाईट रायडर्सनच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून (Instagram Account) रिंकू सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओच्या सुरूवातीला रिंकू घोरत असल्याचं दिसतोय.


आणखी वाचा - Yash Dayal : दिल्ली हत्याकांडावर 'यश दयाल'ची वादग्रस्त स्टोरी, प्रकरण पेटलं अन्...


रिंकू (Rinku Singh) झोपेत असताना फ्लाइटमध्ये प्रवास करताना दिसत आहे. हवेचा दाब जास्त असल्याने विमान उतरू शकत नसल्याचं रिंकू या व्हिडिओमध्ये सांगत आहेत. त्याचबरोबर तो हात जोडत देवाची प्रार्थना करताना दिसतोय. फ्लाइटमध्ये होणाऱ्या गोंधळामुळे घाबरलेल्या अवस्थेत रिंकू दिसतोय. हा व्हिडिओ त्याने मस्ती करताना बनवला असल्याचं समोर येतंय.


आणखी वाचा - अर्जून तेंडूलकरनंतर आता विरेंद्र सेहवागचा लेक IPL डेब्यूच्या तयारीत, बापासारखा तगडा बॅटर; पाहा Video


पाहा Video



दरम्यान, कडाक्याच्या उन्हाळ्यात रिंकू मालदीवमध्ये (Maldives) धमाल करताना दिसतोय. त्याचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. तो पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. त्याचबरोबर त्याचा सिक्स पॅकवाला व्हिडिओ व्हायरल (Trending Video) झाला होता. त्यावर शुभमन गिलची बहीण शहनील गिलनेही (Shahneel Gill) त्याच्या फोटोवर कमेंट केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. रिंकूचे सिक्स पॅक्स पाहून अनेकांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास देखील बसला नाही.