मुंबई : आयपीएलच्या अकराव्या सिझनसाठीचा लिलाव पूर्ण झाला आहे. नेहमीप्रमाणेच या लिलावामध्येही खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला. या लिलावामध्ये केकेआर ही अशी एकमेव टीम आहे जिनं सगळी रक्कम खर्च केली आहे. केकेआरनं यंदाच्या वर्षी एकूण १९ खेळाडूंना विकत घेतलं. तर लिलावाआधी सुनिल नारायण आणि आंद्रे रसेलला रिटेन केलं. लिलावामध्ये केकेआरनं क्रिस लिनला सर्वाधिक रक्कम(९.६ कोटी रुपये) देऊन विकत घेतलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिलावादरम्यान केकेआरनं राईट टू मॅच कार्डचा वापर करत रॉबिन उथप्पा(६.४ कोटी रुपये), कुलदीप यादव(५.८ कोटी रुपये) आणि पियुष चावला(४.२ कोटी) यांना टीममध्ये पुन्हा विकत घेतलं. परदेशी खेळाडूंमध्ये केकेआरनं क्रिस लिनबरोबरच ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कला ९.४ कोटी रुपये देऊन टीममध्ये घेतलं. तर मिचेल जॉनसनसाठी केकेआरनं २ कोटी रुपये खर्च केले.


एवढे पैसे खर्च करूनही केकेआरनं टीम विकत घेताना घोडचूक केल्याचं बोललं जातंय. केकेआरच्या टीममध्ये कोणताही बडा बॅट्समन नाही जो स्वत:च्या जीवावर मॅच जिंकवून देऊ शकेल. इतर टीममध्ये मात्र दोन ते तीन असे खेळाडू आहेत जे एकहाती मॅचचा निकाल फिरवणारे खेळाडू आहेत. बॅट्समनच्या यादीमध्ये केकआरकडे क्रिस लिन, रॉबिन उथप्पा, दिनेश कार्तिक, शुभमन गिल यांच्यावरच बॅटिंगची जबाबदारी असेल.


बॉलर्सच असणार केकेआरचं मुख्य हत्यार


बॅट्समनची कमी असली तरी केकेआरचे बॉलर्स मात्र दर्जेदार आहेत. मिचेल स्टार्क, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, मिचेल जॉनसन, विनय कुमार, सुनिल नारायण, कुलदीप यादव, पियुष चावला यांच्यासारखे बॉलर्स केकेआरकडे आहेत.