नवी मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात लखनऊ सुपर जांयट्सने (lucknow super giants) कोलकाता नाईट रायडर्सवर (kolkata knight riders) 2 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह लखनऊने प्लेऑफ फेरीत धडक मारली आहे. लखनऊ प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारी दुसरी टीम ठरली आहे. (kkr vs lsg ipl 2022 lucknow super giants beat  kolkata knight riders by 2 runs and qualified to playoff at d y patil stadium at navi mumbai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊने कोलकाताला विजयासाठी 211 धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 208 धावाच करता आल्या. कोलकाताकडून कॅप्टन श्रेयस अय्यरने सर्वाधिक 50 धावा केल्या. 


नितीश राणाने वेगवान 42 रन्स काढल्या.  सॅम बिलिंग्सने 36 धावांचं योगदान दिलं. तर शेवटच्या काही षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करत रिंकूने कोलकाताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या.  मात्र Even Lewis ने अफलातून कॅच घेतल्याने रिंकूला मैदानाबाहेरचा रस्ता पकडावा लागला. रिंकूने 15 बॉलमध्ये  40 धावांची वादळी खेळी केली. 


लखनऊकडून मोहसिन खान आणि मार्क्स स्टोयनिसने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर के गौतम आणि रवी बिश्नोई या दोघांनी प्रत्येकी 1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. 


लखनऊची बॅटिंग


त्याआधी लखनऊच्या क्विंटन डी कॉक आणि कॅप्टन के एल राहुल या सलामी जोडीने कोलकाताच्या गोलंदाजांची पिसं काढली. या दोघांनी 210 धावांनी सलामी भागीदारी केली. क्विंटनने नाबाद 140 धावा केल्या. तर केएलने नॉट आऊट 68 रन्स करत क्विंटनला चांगली साथ दिली. या दोघांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीच्या जोरावर लखनऊने कोलकाताला विजयासाठी 211 धावांचे आव्हान दिले.  


दोन्ही टीमची प्लेइंग इलेव्हन


कोलकाता नाइट रायडर्स : वेंकटेश अय्यर, अभिजीत तोमर, श्रेयस अय्यर (कॅप्टन), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, उमेश यादव, टिम साउथी आणि वरुण चक्रवर्ती. 


लखनऊ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (कर्णधार), एव्हिन लुईस, दीपक हुड्डा, मनन वोहरा, मार्कस स्टोयनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, मोहसिन खान, आवेश खान आणि रवी बिश्नोई.