KKR vs RR : युजवेंद्रच्या हॅट्रिकचं पत्नी धनश्री वर्माकडून सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
पतीच्या हॅट्रिकचा आनंद गगनात मावेना, धनश्री वर्माचं स्टेडियममध्ये सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगामा युजवेंद्र चहलसाठी खास ठरला. बंगळुरू टीमने युजवेंद्रला रिटेन न केल्याचं दु:ख आणि काहीसा राग मनात होता. पण युजवेंद्रला राजस्थाननं संधी दिली. युजवेंद्रची कामगिरी पाहून आता बंगळुरू टीमला पश्चाताप करायची वेळ येऊ शकते.
युजवेंद्र चहलने अनोखा विक्रम रचला. 4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात युजवेंद्रने दमदार कामगिरी केल्यानंतर पत्नी धनश्री वर्मा खूप खुश झाली.
प्रत्येक विकेटनंतर धनश्री वर्मा फक्त स्टेडियममध्ये नाचायची बाकी राहिली होती. धनश्रीचा आनंद साजरा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
युजवेंद्रची ही पहिली हॅट्रिक आहे. या हॅट्रिकचा आनंद स्टेडियममध्ये असलेल्या धनश्री वर्माने साजरा केला आहे. राजस्थान टीम पॉईंट टेबलवर दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
कोलकाताचा हा आयपीएलमधील 150 वा सामना होता. ऐतिहासिक सामन्यात राजस्थाननं कोलकातावर विजय मिळवला. या विजयात युजवेंद्रचा मोठा वाटा आहे.
राजस्थाननं पहिल्यांदा फलंदाजी करत 217 धावा केल्या. कोलकातासमोर 218 धावांचं लक्ष्य ठेवलं. कोलकाता टीम 210 धावा करून तंबुत परतली. युजवेंद्रने 4 ओव्हरमध्ये 40 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या.