KKR vs SRH : आऊट झाल्यावर कोपऱ्यात बसून ढसाढसा रडला `हा` खेळाडू, नेमकी चूक कोणाची?
Rahul Tripathi In Tears : आपल्याच चुकीमुळे धावबाद झाल्याने राहुल त्रिपाठी ड्रेसिंग रुमच्या पायऱ्यांवरच बसून ढसाढसा रडला.
SRH vs KKR In IPL 2024 Qualifier : वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) सनरायझर्स हैदराबादला 19.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. मजबूत बॅटिंग लाईनअप असलेल्या हैदराबादला 159 धावा केवळ करता आल्या. स्टार्कने (Mitchell Starc) पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडला खाते न उघडता बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. यानंतर त्याने नितीश रेड्डी आणि शाहबाज अहमदलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. राहुल त्रिपाठीसह हेनरिक क्लासेनने डावाची धुरा सांभाळली आणि अवघ्या 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, राहुल 35 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 55 धावा करून धावबाद झाला. त्यानंतर राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) ड्रेसिंग रुमच्या पायऱ्यांवरच बसून ढसाढसा रडला.
नेमकं झालं काय?
झालं असं की, हैदराबाद फलंदाजी करत असताना हैदराबादने 13 ओव्हरमध्ये 115 धावा केल्या होत्या. त्यावेळी अब्दुल समद आणि राहुल त्रिपाठी मैदानात केकेआरचा सामना करत होते. त्याचवेळी समदने सिक्स मारला अन् हैदराबादच्या जीवात जीव आणला. मात्र, पुढच्याच बॉलवर एक कॉल हुकला अन् त्रिपाठीची विकेट गेली. स्वत: बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिव सामना पाहण्यासाठी आले असताना त्रिपाठीला संधी असताना देखील चमकदार कामगिरी करता आली नाही.
पाहा Video
नेमकी चूक कोणाची?
धाव घेण्याचा कॉल हा नॉन स्ट्राईक एन्डवर उभा असलेल्या राहुल त्रिपाठीचा होता आणि त्याने क्रिझवर पोहोचण्याचा प्रयत्न केला हवा होता. कारण गुरबाज गोलंदाजीच्या शेवटी फेकणार होता. पण त्रिपाठीच्या धाव पूर्ण करण्याच्या आशा गमावल्या आणि मध्येच तो रनआउट झाला. अखेर ड्रेसिंग रुममध्ये जाताना त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाल्याचं दिसून आलं.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.