Asia Cup T20: आशिया कप 2022 सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. टीम इंडियाने या टूर्नामेंटची शानदार सुरुवात केली, पण सुपर-4 टप्प्यात टीम इंडियाला लागोपाठ दोन सामने हरावे लागले आहेत.  टीम इंडियाला अंतिम फेरी गाठणे जवळपास अशक्य झालं आहे. त्यासोबतच भारताच्या दोन खेळाडूंंचं करिअरही धोक्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच्या पराभवाला सर्व खेळाडू जबाबदार आहेत. मात्र पूर्ण आशिया कपमध्ये दोन खेळाडू फ्लॉप ठरले. हे दोन्ही खेळाडू आगामी काळात भारतीय संघातून कायमचं स्थानही गमावू शकतात. यामध्ये आशिया कपमध्ये भारताचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि सलामीवीर के. एल. राहुल यांचा समावेश आहे. 


टीम इंडियाचा सर्वात विश्वासार्ह गोलंदाज आशिया कपमध्ये फेल गेला. सुपर 4 मधील भारतीय संघाच्या पराभवाला भुवनेश्वर कुमार जबाबदार आहे. कारण सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला शेवटच्या 2 षटकात 21 धावांची गरज होती, त्यामुळे रोहितने भुवनेश्वरवर विश्वास दाखवत त्याला 19 वे षटक दिले. मात्र भुवीला त्याच्या अनुभवाचा फायदा उठवता आला नाही आणि त्याने या षटकात 14 धावा दिल्या त्यामुळे सामना श्रीलंकेच्या पारड्यामध्ये झुकला. 


पाकिस्तानविरुद्धही असंच काहीसं चित्र होतं. 19 व्या षटकाची जबाबदारी भुवीकडे सोपवण्यात आली होती. पाकिस्तानविरुद्धही त्याने 19 व्या षटकात 19 धावा खर्च केल्या. दोन्ही प्रसंगी अर्शदीप सिंगला शेवटच्या षटकात केवळ 7 धावा मिळाल्या, ज्याला वाचवणं फार कठीण होतं.


टीम इंडियाचा स्टार ओपनिंग बॅट्समन के.एल. राहुलचीही आशिया कपमध्ये अत्यंत खराब कामगिरी राहिली. आशिया चषकापूर्वी राहुल पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही यावर प्रश्न उपस्थित केलं जात होतं. सलामीवीर म्हणून राहुल पूर्णपणे अपयशी ठरला. के.एल. श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 6 धावा करून बाद झाला. रविवारी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात राहुलही अवघ्या 28 धावा काढून बाद झाला होता.


राहुलला वर्ल्डकपमधून वगळणं योग्य ठरेल का, असा प्रश्न आता त्याच्या खराब कामगिरीवर उपस्थित केला जात आहे. राहुलच्या जागी ईशान किशन सलामीची जबाबदारी स्वीकारू शकतो. याशिवाय शिखर धवनसारखे अनुभवी सलामीवीरही संघाबाहेर बसले आहेत.