लखनऊचा कॅप्टन के एल राहुलनं मोडला सेहवाग, वॉर्नरचा रेकॉर्ड
के एल राहुलच्या नावावर अनोखा रेकॉर्ड, 6 वर्षातली त्याची अनोखी कामगिरी
मुंबई : लखनऊ विरुद्ध हैदराबाद सामना नुकताच पार पडला. यामध्ये हैदराबाद टीमला 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. लखनऊचा सलग दुसरा विजय असला तरी के एल राहुलला मात्र कोणताही आनंद झाला नाही. हैदराबात विरुद्ध सामन्यात के एल राहुलने अर्धशतक झळकवलं.
के एल राहुलने सेहवाग आणि वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला आहे. 6 वर्षांत त्याने अनोखी कामगिरी केली. 2016 पासून आतापर्यंत के एल राहुलनं 30 अर्धशतक झळकवलं.
के एल राहुलने 50 बॉलमध्ये 68 धावा केल्या यामद्ये त्याने 6 चौकार आणि 1 षटकार ठोकला आहे. या अर्धशतकासोबत वॉर्नरचा रेकॉर्ड तोडला आहे. गेल्या 6 वर्षांत IPL मध्ये सर्वात जास्त अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे.
आयपीएलमध्ये 2016 पासून आतापर्यंत 30 अर्धशतक के एल राहुलने केली. वॉर्नरने 29 अर्धशतकं केली आहेत. या रेकॉर्डमध्ये कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे ज्याने 28 अर्धशतक झळकवली आहेत. त्या खालोखाल 26 अर्धशतक डिव्हिलियर्सने ठोकले आहेत.
राहुलकडून सामन्यानंतर मोठी अपडेट
पावर प्लेमध्ये विकेट्स घालवणं अजिबात आवडलं नाही. तसं जर वारंवार होत राहिलं तर त्याचा फॉर्मवर फरक पडतो. अजून बरं शिकण्याची गरज आहे. फलंदाजीवर अजून लक्ष द्यायला हवं आहे. गोलंदाजीमध्ये आम्ही तिन्ही सामन्यात वरचढ ठरलो. मात्र फलंदाजीमध्ये मार खाल्ला.
आयपीएलमध्ये कर्णधारपदावर असताना सर्वात जास्त अर्धशतक झळकवणारे खेळाडू
विराट कोहली- 40
गौतम गंभीर- 31
डेव्हिड वॉर्नर- 27
रोहित शर्मा- 23
एमएस धोनी- 22
टी 20 मध्ये सर्वात जास्त अर्धशतक ठोकणारे भारतीय खेळाडू
विराट कोहली 76
रोहित शर्मा 69
शिखर धवन 63
सुरेश रैना 53
के एल राहुल 50