मुंबई : साऊथ आफ्रिकेच्या विरूद्ध जोहानिसबर्गमध्ये टेस्ट मॅच खेळली जात आहे. या खेळात विराट कोहली (Virat Kohli) ला दुखापत झाल्यामुळे तो यामध्ये सहभागी नाही. विराट कोहली (Virat Kohli) च्या अनुपस्थितीत केएल राहुल (KLRahul) ला भारतीय संघाचा कर्णधार बनवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केएल राहुल (KL Rahul) यासोबतच विराट कोहलीला मागे टाकलं आहे. एवढंच नव्हे तर या सामन्यात त्याने चक्क कॅप्टन कूल एम एस धोनीची बरोबरी केली आहे. 


केएल राहुलने कसोटी संघाची कमान हाती घेतल्याने त्याने वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि जीएस रामचंद यांचेही विक्रम मोडीत काढले. त्याचबरोबर त्याने महेंद्रसिंग धोनीचीही बरोबरी केली. मात्र, तो अजिंक्य रहाणेचा विक्रम मोडण्यास मुकला.


कॅप्टन होताच राहुलची मोठी कामगिरी 


सर्वात कमी प्रथम श्रेणी सामन्यांचे नेतृत्व केल्यानंतर, KL राहुल कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करण्याच्या बाबतीत महेंद्रसिंग धोनीसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या प्रकरणात अजिंक्य रहाणे पहिल्या क्रमांकावर आहे. रहाणेने एकाही प्रथम श्रेणी सामन्याचे नेतृत्व न करता कसोटी संघाची धुरा सांभाळली.


भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करणारा राहुल कर्नाटकातील चौथा क्रिकेटपटू आहे. राहुलच्या आधी 1980 मध्ये गुंडप्पा विश्वनाथ, 2003-2007 मध्ये राहुल द्रविड आणि 2007-2008 मध्ये अनिल कुंबळे यांनी कसोटी संघाची धुरा सांभाळली होती. केएल राहुलच्या आधी, गुंडप्पा विश्वनाथने 1980 मध्ये 2 कसोटींमध्ये, राहुल द्रविडने 2003 ते 2007 दरम्यान 25 कसोटींमध्ये आणि अनिल कुंबळेने 2007-08 मध्ये 14 कसोटींमध्ये कर्णधारपद भूषवले होते.


दिग्गज व्यक्तींचा मोडला रेकॉर्ड 


2005 नंतर ही दुसरी वेळ आहे, जेव्हा गेल्या 4 कसोटी सामन्यांमध्ये 3 खेळाडूंनी टीम इंडियाची धुरा सांभाळली आहे. सप्टेंबर 2005 मध्ये, सौरव गांगुलीने हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध कसोटी संघाची जबाबदारी स्वीकारली. डिसेंबर 2005 मध्ये, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये राहुल द्रविडने संघाची कमान सांभाळली. मालिकेतील तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळला गेला. त्यात वीरेंद्र सेहवागने संघाचे नेतृत्व केले. भारताचा कर्णधार होण्यापूर्वी राहुलला केवळ एका प्रथम श्रेणी सामन्याचे नेतृत्व करण्याचा अनुभव होता.


पहिल्या स्थानावर अजिंक्य रहाणे 


भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारण्यापूर्वी धोनीने केवळ एका प्रथम श्रेणी सामन्यात कर्णधारपद भूषवले होते. या यादीत पहिले स्थान अजिंक्य रहाणेचे आहे, जो प्रथम श्रेणीत कर्णधार म्हणून एकही सामना न खेळता भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे कोहली या सामन्यातून बाहेर पडला आहे, त्याच्या जागी हनुमा विहारीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.


या सामन्यात हनुमा विहारी काही विशेष करू शकला नाही. विहारीने जानेवारी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे शेवटची कसोटी खेळली होती. केपटाऊनमधील तिसरी कसोटी विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 100 वा सामना ठरला असता, पण आता त्याला फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेची वाट पाहावी लागणार आहे.