कटक : कटकमध्ये झालेल्या पहिल्या टी-20मध्ये धोनीनं २२ बॉल्समध्ये ३९ रन्स केल्या. तसंच विकेट कीपिंग करतानाही धोनीनं २ कॅच घेतले आणि २ स्टम्पिंग केले. या दमदार कामगिरीमुळे धोनीनं त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये के.एल.राहुल यानं पत्रकारानं विचारलेल्या धोनीबद्दलच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. महेंद्रसिंग धोनी ड्रेसिंग रूममध्ये प्रेरणादायी आहे आणि प्रेरणादायीच राहील, असं राहुल म्हणालाय.


धोनी कायम मॅचविनरच असेल. त्याचा फिटनेस चांगला आणि तो बॅटिंगही चांगली करत आहे, असं राहुल म्हणाला. तुम्ही कोणत्या फॉर्म बद्दल बोलताय हे मला माहित नाही. पण मी जेव्हा त्याच्याबरोबर खेळतो तेव्हा तो फॉर्ममध्ये असतो आणि नेहमी रन्स बनवतो, असं सडेतोड उत्तर के.एल. राहुलनं दिलं.