दुबई : भारत भलेही आशिया कपमधून बाहेर पडला असेल, पण टी-20 वर्ल्डकपपूर्वी विराट कोहलीच्या रूपाने भारतीय टीमसाठी मोठी बातमी आली आहे. कोहलीने आपल्या सर्व टीका करणाऱ्यांची तोंडं बंद करत टी-20 मधील पहिलं शतक झळकावून टीम इंडियाला मोठा विजय मिळवून दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कपच्या स्पर्धेमध्ये कोहलीने दोन अर्धशतकांसह 1 शतक झळकावलं आणि आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय. दरम्यान सामन्यानंतर जेव्हा केएल राहुलला टी-20 मध्ये कोहलीला सलामी करण्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी राहुलने असं उत्तर दिलं की, ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.


मी टीमबाहेर जाऊ का?-KL Rahul


अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातील विजयानंतर केएल राहुल मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. त्याने कोहलीच्या शतकाचं कौतुक केलं. अशा स्थितीत एका पत्रकाराने त्याला विचारले की, विराट कोहलीने ओपनिंग करताना शतक केलंय. यापूर्वी आयपीएलमध्येही त्याने असा खेळ केला आहे. त्याने पहिल्या टी-20मध्ये 5 शतके झळकावली आहेत. त्यामुळे टी-20 वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ओपनिंह म्हणून त्याला उतरवण्यात येईल का?


अशावेळी जराही वेळ न घालवता KL Rahul ने तातडीने पत्रकाराला उत्तर दिलं की, मग मी स्वतः टीमबाहेर जाऊ का? 


ते पुढे म्हणाले की, "कोहली महान खेळाडू आहे. केवळ ओपनिंग करतासाठी नाही त तो चांगली कामगिरी करेल असे नाही. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय टीमसाठीसाठी तो चांगली कामगिरी करतोय. त्यानुसार टी-20 वर्ल्डकपमध्येही तो अशीच कामगिरी करेल."