KL Rahul देवदूत बनून आला धावून, 11 वर्षाच्या मुलाला शस्त्रक्रियेसाठी इतक्या लाखांची मदत
KL Rahul याला जेव्हा या मुलाबाबत माहिती मिळाली. त्याने जरा ही वेळ न गमवता मदतीसाठी हात पुढे केला. ज्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल करोडो भारतीयांच्या अपेक्षा घेऊन मैदानात उतरतो आणि आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकतो, पण मैदानाबाहेर या खेळाडूच्या औदार्याचा एक अनोखा पुरावा समोर येत आहे. केएल राहुलने अलीकडेच एका 11 वर्षाच्या मुलाला शस्त्रक्रिया करण्यात मदत केली. या मुलाला अॅप्लास्टिक अॅनिमिया आणि रक्ताच्या अनेक गंभीर विकारांनी ग्रासले होते.
केएल राहुलकडून 31 लाखांची मदत (KL Rahul Donate)
वरद असे या मुलाचे नाव असून, वरदला बरे होण्यासाठी तातडीने बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज होती. ज्यामध्ये 35 लाख रुपये खर्च होणार होता. मात्र एवढा महागडा खर्च उचलण्यासाठी या मुलाच्या कुटुंबाकडे पैसे नव्हते. राहुल (KL Rahul) याला या मुलाची समस्या समजताच त्यांनी तातडीने या मुलाला 31 लाख रुपयांची मदत केली.
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वरदच्या पालकांनी एका एनजीओच्या माध्यमातून बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आवश्यक असलेली ३५ लाख रुपये जमा करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, वरदवर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वरदच्या शरीरात रक्ताचे प्रमाण खूपच कमी होते आणि त्याची प्रतिकारशक्तीही कमी होत होती. त्यामुळे वरदवर लवकरात लवकर उपचार होणे गरजेचे होते.
मध्यमवर्गीय कुटुंबातील वरदवर पैशाच्या कमतरतेमुळे तातडीने उपचार होऊ शकले नाहीत. वरदच्या शस्त्रक्रियेसाठी त्याच्या वडिलांनी पीएफचे पैसेही ठेवले होते. पण या कठीण काळात वरदच्या कुटुंबासाठी ते पुरेसे नव्हते. एल राहुल देवदूत बनून समोर आला आणि उपचारासाठी आवश्यक रक्कम दिली.
केएल राहुल म्हणतो की, 'जेव्हा मला वरदची प्रकृती कळली तेव्हा माझ्या टीमने कुटुंबाशी आणि NGOशी संपर्क साधला. जेणेकरुन आपण त्याला कोणत्याही प्रकारे मदत करू शकतो. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा मला आनंद आहे. मला आशा आहे की वरद लवकरात लवकर त्याच्या पायावर उभा राहील आणि त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुढे जाईल. मला आशा आहे की माझे योगदान अधिकाधिक लोकांना पुढे येण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी प्रेरित करेल.'