मुंबई : क्रिकेटच्या मैदानात दुर्घटना होत असतात.कधी खेळाडू कॅच घेताना जखमी होतो तर कधी दुर्घटनांमुळे. मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्यात एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. के एल राहुलच्या एका शॉटमुळे बॉलर आणि अंपायरवर संकट कोसळलं होतं. बॉलरच्या हाताला थोडी दुखापत झाली पण अंपायर वाचला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता के एल राहुलने एक शॉट खेळला. बॉल बॉलरच्या समोर आणि अंपायरच्या डोक्याला लागणार होता. बॉलरच्या हाताला थोडी दुखापत झाली. तर अंपायरने वेळीच खाली वाकल्यामुळे अनर्थ टळला. 


18 व्या ओव्हरमध्ये जयदेव उनादकटने टाकलेल्या पाचव्या बॉलदरम्यान हा प्रकार घडला. के एल राहुलने मुंबईच्या बॉलर्सची धुलाई केली. त्याने मुंबई विरुद्धच्या सामन्यात आपलं दुसरं शतक झळकवलं आहे. अंपायर जर वेळीच खाली वाकला नसता तर त्याला दुखापत झाली असती. 


लखनऊ टीमने मुंबईचा 36 धावांनी पराभव केला. के एल राहुलने झंझावाती खेळी केली. मुंबई टीमला 8 गडी गमावून 132 धावा करता आल्या. मुंबई आताही विजयापासून दूरच राहिली. प्ले ऑफच्या रेसमधून मुंबई टीम बाहेर पडली आहे. मुंबईचा सलग 8 वा पराभव झाला.