केएल राहुल तिच्यावर भुलला... गर्लफ्रेंडसोबतचा सर्वात रोमॅन्टिक फोटो समोर
अथिया शेट्टीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
मुंबई : व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. या खास प्रसंगी भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुलने त्याची प्रेयसी अथिया शेट्टीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
जरी दोघेही नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल मीडियासमोर बोलणं टाळतात, पण त्यांचे रोमॅन्टिक पोस्ट सगळं काही सांगून जातात. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने के एल राहुलने गर्लफ्रेंड अथियासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात दोघांची बॉण्डिंग जबरदस्त दिसत आहेत.
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने अथियासोबतचा एक फोटो केएल राहुलने शेअर करत 'हॅपी लव्ह डे' असे लिहिले. या पोस्टला उत्तर देत अथियाने कमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे.
यापूर्वी, अथियाच्या वाढदिवशी केएलने तिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते, 'हॅपी बर्थडे माय लव्ह'.अथिया ही बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. केएल आणि अथिया दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. यापूर्वी अथिया केएल राहुलसोबत सार्वजनिक कार्यक्रमात पोहोचली होती.
केएल राहुल सध्या भारतीय संघात आहे. टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध होम सीरिज खेळत आहे.