मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धची सीरिज संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू आराम आणि मौजमजा करताना दिसत आहेत. केएल राहुलने अभिनेत्री आथिया शेट्टीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. या फोटोमध्ये केएल राहुलच्या हातात टेलीफोन आहे, तर आथिया शेट्टी राहुलकडे बघून हसताना दिसत आहे. राहुलने या फोटोला दिलेलं कॅप्शनही चर्चेचा विषय ठरतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आथिया शेट्टीचे वडिल सुनिल शेट्टीचा लोकप्रिय चित्रपट हेरा फेरीमधला डायलॉग राहुलने फोटोच्या कॅप्शनला दिला आहे. 'हॅलो देवी प्रसाद....?' असं कॅप्शन राहुलने या फोटोला दिलं आहे. सुनिल शेट्टीनेही हसण्याचे इमोजी वापरत या फोटोवर कमेंट केली आहे.




आथिया शेट्टी ही केएल राहुलची गर्लफ्रेंड असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहेत. पण याला या दोघांकडूनही दुजोरा देण्यात आलेला नाही. राहुल आणि आथियाला अनेक वेळा हॉटेल, आणि कॅफेंमध्ये एकमेकांसोबत याआधी पाहण्यात आलं आहे.


कुटुंब, मैत्री आणि नाती ही माझ्यासाठी अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. याबाबत मी काहीच बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया आथिया शेट्टीने केएल राहुलबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिली होती.