मुंबई : आयपीएलचे सामने सुरू होण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी आहेत. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. यंदा 8 ऐवजी 10 संघ आयपीएलच्या मैदानात उतरणार आहेत. लखनऊ आणि गुजरात संघ दोन जादा असणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये 4 संघ सोडले तर सगळ्यांचे कर्णधार बदलले आहेत. त्यांची लिस्टही जारी करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब संघाने के एल राहुलला रिटेन न केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. के एल राहुलने पंजाब किंग्स सोबत न राहण्याचा निर्णय घेतला होता. तो नव्या संघासोबत जाईल असं त्याने ठरवलं होतं. यंदा लखनऊ संघाने के एल राहुलला आपल्या संघात घेतलं आणि कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे दिली. 


के एल राहुल दोन वर्ष पंजाब संघाचं नेतृत्व करत होता. त्याने कर्णधारपद सांभाळून चांगली फलंदाजीही केली. तो टीमला प्लेऑफपर्यंत पोहोचवू शकला नाही. त्यानंतर त्याने पंजाब संघ सोडण्याचा निर्णय घेतला. 


टीम सोडण्याचा निर्णय खूप कठीण
'माझ्यासाठी हा निर्णय घेणं खूप जास्त कठीण होतं. मी पंजाब संघासोबत 4 वर्ष होतो. खूप चांगल्या आठवणी आणि वेळ या संघासोबत घालवता आला. मला पाहायचं होतं माझ्यासाठी आणखी काय गोष्टी नवीन असू शकतात. माझ्यासाठी काही नवीन गोष्टी असू शकतात का?' 


'संघ सोडण्याचा निर्णय निश्चितच कठीण होता. मला हे पाहायचं होतं की मी आणखी काही वेगळं करू शकतो का? त्यामुळे मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला', असं के एल राहुलनं यावेळी स्पष्ट केलं आहे. 


यंदा आयपीएल 2022 चं पंजाबचं कर्णधारपद मयंक अग्रवालकडे असणार आहे. तर के एल राहुल लखनऊ संघाचा कर्णधार आहे. यंदा के एल राहुलला लखनऊ संघ प्ले ऑफपर्यंत पोहोचवण्यात यश मिळतं का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.