दुबई : आयपीएल 2021 मध्येही पंजाब किंग्जची (पीबीकेएस) कामगिरी निराशाजनक होती आणि ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकले नाहीत. मात्र, संघाचा कर्णधार केएल राहुल याने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजीने चमकदार कामगिरी केली. राहुलने 13 सामन्यांमध्ये 62.60 च्या सरासरीने 626 धावा केल्या, ज्यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान यामध्ये केएल राहुल यानंतर पंजाबची साथ सोडणार का असं म्हटलं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल 2018 मध्ये पंजाबच्या टीममध्ये राहुलचा समावेश करण्यात आला. त्यानंतर त्याने प्रत्येक हंगामात चांगली कामगिरी केली आहे. त्याने गेल्या चार वर्षात टीमसाठी सलग 500 पेक्षा जास्त रन्स केले आहेत. दरम्यान आता राहुलला पंजाब टीमपासून स्वतःला वेगळं करायचं आहे. क्रिकबझमधील एका रिपोर्टनुसार, राहुल पुढच्या वर्षी पंजाब किंग्जकडून खेळू इच्छित नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, केएल राहुल पुढील वर्षी पंजाब किंग्जचा भाग राहणार नसल्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मेगा लिलावात त्याचा समावेश केला जाऊ शकतो. दरम्यान काही फ्रँचायझींनी राहुलशी संपर्क साधला आहे आणि त्यांनी या स्टार फलंदाजाला त्यांच्या टीममध्ये समाविष्ट इच्छूक असल्याचं समजलं आहे.


भारतीय क्रिकेट बोर्डाने अद्याप मेगा लिलावासाठी असलेल्या नियमांची घोषणा केली नाहीये. म्हणूनच, फ्रेंचायझींना उपलब्ध असणाऱ्या रिटेन्शनची संख्या आणि राईट टू मॅच कार्ड्सबाबत शंका कायम आहेत.


सध्या केएल राहुल यूएईमध्ये आहे आणि पंजाब आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर तो भारतीय संघाच्या वर्ल्डकपसाठी बायो-बबलमध्ये सामील झाला आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात दोन नवीन संघ खेळणार आहे. यांची घोषणा 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही संघ लिलावात केएल राहुलला खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकतात.