मुंबई : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. भारताचा पहिला सामना हा पाकिस्तान विरोधात होणार आहे. या महासामन्यासाठी टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. कोहली आणि कंपनीने पाकिस्तान विरोधात मास्टर प्लान तयार केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचे फास्ट बॉलर्स मोहम्मद आमिर, जुनैद खान आणि वहाब रियाजचा सामना करण्यासाठी भारतीय टीमने तयारी केली आहे. तिन्ही ही बॉलर डाव्या हाताने बॉलिंग करतात. विराटने सराव करतांना स्पिनर रवींद्र जडेजाला फास्ट बॉलिंग करायला सांगितली. 


आमिरने आतापर्यंत भारताविरोधात यशस्वी ठरला आहे त्यामुळे भारताने त्याचा सामना करण्यासाठी चांगलीच तयारी केली आहे. मागच्या वर्षी आमिरवर मॅच फिक्सिंगचे आरोप होते त्यामुळे ६ वर्ष त्याच्या खेळावर बंदी होती. ६ वर्षानंतर तो संघात परत येतोय. 


२५ वर्षाचा हा बॉलर सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये पाकिस्तानला मोठ्या विकेट मिळवून देऊ शकतो. आमिरने ३२ वनडेमध्ये ५० विकेट घेतले आहे.