बर्मिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला. या मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार कामगिरी केली. पहिल्या इनिंगमध्ये विराटनं १४९ रन तर दुसऱ्या इनिंगमध्ये ५१ रन बनवले. पण दुसऱ्या बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळे भारताला १९४ रनचं लक्ष्य गाठता आलं नाही. या मॅचच्या दोन्ही इनिंग मिळून विराटनं २०० रन केले. याचबरोबर टेस्टमध्ये सर्वाधिक वेळा २०० रन करण्याचा विक्रम विराटनं केला आहे. याआधी हे रेकॉर्ड सचिन आणि राहुल द्रविडच्या नावावर होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीनं एका टेस्टमध्ये २०० पेक्षा जास्त रन ११ वेळा बनवल्या आहेत. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडनं १० वेळा २०० पेक्षा जास्त रन केल्या आहेत. विरेंद्र सेहवागनं ९ वेळा, सुनील गावसकर यांनी ६ वेळा आणि व्हीव्हीएस लक्ष्मणनं ४ वेळा एका टेस्ट मॅचमध्ये २०० पेक्षा जास्त रन केले आहेत.


बॅट्समननी खेळलेल्या शॉट्सची निवड चुकीची होती. बॅट्समननी रणनिती योग्य पद्धतीनं लागू केली नाही. या मॅचमधून सकारात्मक गोष्टी घेऊन पुढे जायची गरज आहे, अशी प्रतिक्रिया विराटनं या पराभवानंतर दिली आहे. ज्या पद्धतीनं इंग्लंडविरुद्ध आम्ही सुरुवात केली त्यामुळे मी खुश आहे. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना ईशांत शर्मा आणि उमेश यादव खेळपट्टीवर टिकून राहिले. या दोघांकडून शिकण्याची गरज आहे, असा टोला विराटनं भारतीय बॅट्समनना लगावला.