गॉल : भारतीय संघाने यजमान श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ३०४ धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत १-०अशी आघाडी घेतली. या विजयाचे श्रेय कर्णधार विराट कोहलीने सलामीवीर शिखर धवन आणि अभिनव मुकुंद या जोडीला दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुरली विजय आणि लोकेश राहुल यांच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटीत शिखर धवन आणि लोकेश राहुलला संधी देण्यात आली होती. शिखर धवनने पहिल्या डावात १९० धावांची दमदार खेळी केली होती. तर अभिनव मुकुंदने दुसऱ्या डावात ८१ धावा केल्या. 


सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विराटने या जोडीचे कौतुक केले. शिखर-मुकुंद या जोडीने चांगली कमगिरी केली. अभिनव मुकुंदने चांगली फलंदाजी केली, असे विराट म्हणाला.