कोहलीचे 2020 या वर्षात एकही शतक नाही, यावर वॉनने दिली अशी प्रतिक्रिया
माईकल वॉनची विराटबाबत अशी प्रतिक्रिया
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या वनडे सामन्यात विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 22 हजार धावा पूर्ण केल्या. दुसर्या एकदिवसीय सामन्यात विराटने 89 धावांची खेळी साकारली. ही या वर्षीची आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी होती. विराटने यावर्षी एकूण 8 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात त्याने चार अर्धशतके झळकावले आहेत. पण एकही शतक करता आलं नाही. यावर्षी कोविड १९ मुळे मार्च ते 27 नोव्हेंबर दरम्यान भारत कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही.
यावर्षी अजून शतक ही शतक न केलेल्या विराटबद्दल इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाला की, काळजी करण्याची काहीच गोष्ट नाही. विराटच्या फलंदाजीची मला अजिबात चिंता नाही कारण तो एक उत्तम फलंदाज आहे. सध्या तो क्रिकेटच्या सर्व स्वरूपात जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे आणि यात कोणत्याही प्रकारची शंका नाही.
वॉनने सांगितले की, विराट कोहली चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात खेळेल आणि शेवटच्या तीन सामन्यात तो संघात सहभागी होणार नाही. ज्या तीन कसोटी सामन्यांमध्ये विराट खेळणार नाही, त्याची मला चिंता आहे. मला असं वाटत नाही की विराटशिवाय टीम इंडिया ते सामने जिंकू शकेल. कसोटीत तो त्याच्या संघासाठी खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर वॉनने विराटच्या शतकावर असे म्हटले की लवकरच तो शतक ठोकेल आणि त्यानंतर आणखी शतके पाहायला मिळतील.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे सिरीज गमवली असून. तिसरा सामना बुधवारी कॅनबेरा येथे खेळला जाईल. त्यानंतर तीन टी-20 सामन्यांची मालिका आणि 4 सामन्यांची कसोटी मालिका होईल.