लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत फायनल ही भारत आणि इंग्लंडमध्ये व्हावी अशी फॅन्सची इच्छा असल्याचं विधान टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं केलंय. कोहलीच्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल बुधवारी रंगणार आहे. या स्पर्धेची प्रमुख दावेदार समजली जाणा-या बलाढ्य इंग्लंड आणि पाकिस्तान दरम्यान पहिली सेमीफायनलसाठी लढत होणार आहे. 


त्यानंतर दुसरी सेमीफायनल टीम इंडिया आणि अंडरडॉग्स असणा-या बांगलादेशमध्ये रंगणार आहे. ही मॅच टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंगसाठी स्पेशल असणार आहे. ही मॅच युवराजची वनडे क्रिकेट करियरमधील तीनशेवी मॅच असेल. 


दरम्यान, कोणत्याही दबाव आणि दडपणाशिवाय बांगलादेशची टीम मैदानात उतरेल असा विश्वास कॅप्टन मश्रफी मुर्तजा यानं व्यक्त केलाय