दिल्ली : यंदाच्या वर्षी टी-20 वर्ल्डकपनंतर टीम इंडियामध्ये बरेच बदल होणार आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 चं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाचे मुख्य कोच रवी शास्त्रीही आपलं पद सोडणार आहेत. 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकानंतर संघाला एक नवीन कर्णधार आणि प्रशिक्षक मिळणार आहे.


हा दिग्गज पुन्हा कोच बनण्याची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने टी -20 चे कर्णधारपद सोडल्यापासून रोहित शर्माला कर्णधार बनवण्याची चर्चा आहे. पण या दरम्यान, रवी शास्त्री यांच्यानंतर कोच पदाची धुरा पुन्हा एकदा अनिल कुंबळे याच्याकडे जाणार असल्याच्या चर्चा आहेत.


टी -20 वर्ल्डकपनंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांचा कार्यकाळ संपणाप आहे. त्यामुळेच बीसीसीआय पुन्हा एकदा अनिल कुंबळेला मुख्य प्रशिक्षक बनवण्याचा विचार करतं. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची अनिन कुंबळेने 2017 मध्येही प्रशिक्षक म्हणून कायम राहावं अशी इच्छा होती.


कोहलीमुळे कुंबळेने प्रशिक्षकपद सोडलं?


अनिल कुंबळे 4 वर्षांपूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते. पण त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कोहलीने शास्त्रींना कोचच्या पदासाठी पाठिंबा दिला. त्यानंतर 2016 मध्ये कुंबळे मुख्य प्रशिक्षक झाले.


दरम्यान भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) क्रिकेट प्रमुखपदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. त्यामुळे आता हे अगदी स्पष्ट आहे की द्रविड भारताचा पुढील प्रशिक्षक बनू शकणार नाही