कोल्हापुर ते विम्बल्डन वारी! महाराष्ट्राच्या कन्येने जिंकली भारतीयांची मने
अभिनेत्यांपासून राजकारणी मंडळी का करतायत महाराष्ट्राच्या `या` टेनिसपटूची प्रशंसा
कोल्हापूर : विम्बल्डन सारख्या मोठ्या टेनिस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या ऐश्वर्या जाधव हीची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे. अभिनेत्यांपासून राजकारणी मंडळी ऐश्वर्या जाधवचा व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून तिचे कौतूक करतायत. त्यामुळे नेमकं या खेळाडूने असं काय केलंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलंच. त्यामुळेच जाणून घेऊयात या टेनिसपटूची कामगिरी.
मुळची कोल्हापूरची असलेल्या ऐश्वर्या जाधव या तरूणीची विम्बल्डन टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली होती. विशेष म्हणजे भारतातून निवड झालेली ती एकमेव तरूणी होती. या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत ऐश्वर्या जाधवनेच भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
14 वर्षांखालील विम्बल्डन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवला पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या रोमानियाच्या अॅन्ड्रिया सोरविरुद्ध तिला संघर्षपूर्ण लढतीत पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या सेटमध्ये ऐश्वर्याने अॅन्ड्रियाविरुद्ध 3-0 अशा आघाडी घेतली होती. पण पुढे अॅन्ड्रियाने आक्रमक खेळ केल्याने ऐश्वर्या प्रतिकार थोडा कमकुवत ठरला आणि तिला 6-3,6-2 असा पराभव स्वीकारावा लागला.
देशातून एकमेव निवड झालेली कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवला विम्बल्डनमध्ये पराभव स्वीकारावा लागला, असला तरी पण तिचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. कारण तिने पहिल्याच प्रयत्नात दाखवलेला खेळ आणि आत्मविश्वास नक्कीच तिची भावी वाटचाल दाखवणारा आहे.
दरम्यान राज्यात सुरु असलेल्या राजकारणामुळे तिच्या या भल्या मोठ्या कामगिरीकडे प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष गेले नाही. अनेक माध्यमांनी तिच्या या कामगिरीची दखल घेतली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक अभिनेते, राजकारणी तिचा फोटो पोस्ट करत तिचे कौतूक करतायत. त्यामुळे तिच्या नावाची खुप चर्चा सुरु आहे.