मुंबई : मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्यानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये मुंबईनं टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. यंदाच्या मोसमामध्ये मुंबईची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. ९ पैकी ६ मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे तर ३ मॅच जिंकण्यात रोहितच्या टीमला यश आलं आहे. ६ पॉईंट्सह मुंबई ५व्या क्रमांकावर आहे. पंजाबविरुद्धची मागची मॅच मुंबईनं जिंकली होती. अशीच कामगिरी या मॅचमध्ये करण्याचं आव्हान मुंबईच्या टीमपुढे असणार आहे. प्ले ऑफला क्वालिफाय होण्यासाठी मुंबईला ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. दुसरीकडे कोलकात्यानं ९पैकी ५ मॅच जिंकल्या आहेत. १० पॉईंट्सह कोलकात्याची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाता किंवा मुंबई कोणतीही टीम ही मॅच जिंकली तरी पॉईंट्स टेबलमध्ये कोणताही फरक पडणार नाही.


मुंबईची टीम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, एव्हिन लुईस, इशान किशन, जेपी ड्युमिनी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, बेन कटिंग, मिचेल मॅकलेनघन, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह


कोलकात्याची टीम


ख्रिस लिन, सुनिल नारायण, रॉबिन उथ्थपा, शुभमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, पियुष चावला, मिचेल जॉनसन, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव