नवी दिल्ली : ऑसट्रेलियाच्या विरोधात कोलकाता वनडेमध्ये भारतीय टीमचा युवा स्पिनर कुलदीप यादवने हॅट्रीक घेतली. वनडे क्रिकेटमध्ये भारतीय टीमकडून हॅट्रीक घेणारा तो तिसरा गोलंदाज बनला आहे. कुलदीप हा पहिला भारतीय स्पिनर आहे ज्याने हॅट्रीक घेतली आहे. कुलदीपने याआधी देखील एकदा हॅट्रीक घेतली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ अंडर १९ वर्ल्डकपमध्ये स्कॉटलँड विरोधात त्याने हैट्रीक घेतली होती. कुलदीपने ऑस्ट्रेलिया विरोधातील सामन्यामध्ये 33व्या ओव्हरमध्ये हॅट्रीक घेतली होती. याआधी चेतन शर्मा (1987) आणि कपिल देव (1991) यांनी हॅट्रीक घेतली होती.


कपिल देव यांनी  ईडन गार्डनमध्ये हॅट्रीक घेतली होती. चेतन शर्मा यांनी देखील वनडेमध्ये भारताकडून सर्वात प्रथम हॅट्रीकचा घेतली होती.